Posts

Showing posts from January, 2018

क्रांती - महेश बोरगे

काल, आज आणि उद्या             ‘मी स्त्री आहे हे वास्तव जगाने स्वीकारायला हवे. साहजिकच एक स्त्री म्हणुन मी सुंदर असणे स्वाभाविक आहे परंतु सुंदर असण्यापेक्षा मला पुरुषांना आकर्षित करण्यासाठी मला अधिक गरम किंवा मादक असायलाच हवे आणि हा मला लोकशाहीने दिलेल्या मुलभूत हक्कापैकी एक हक्क आहे.’ हो, काय चुकीच आहे, एकेकाळी सांगलीच्या (नागठाणेच्या) बाळगंधर्वांनी स्वतः स्त्रीचा अभिनय करून स्त्रीला माणसात आणले. आणखी थोडस पाठीमागे गेलो आणि काळाचा पडदा किलकिला करून पाहिलं तर सदासर्वदा इतकंच जाणलं की स्त्रीला परमपुज्य रामांनी देखील एक मर्यादेतच ठेवले होते. कारण काहीही असो पण स्त्री आणि मर्यादा हे एक समीकरणच होते. परंतु एकदमच पाठीमागे भुतकाळात ज्यावेळी समाज किंवा कोणतीही रुढी – परंपरा नव्हती तेंव्हा कोणालाही कसल्याही मर्यादा नव्हत्या हेही ध्यानांत घ्यायला हवं.                 ज्यावेळी समाज वेगवेगळ्याप्रकारे वेगवेगळ्या थरात स्वतःला आकार देत गेला त्यावेळी प्रत्येक घरातील आजी, आई, बायको, बहिण, मुलगी या वेगवेगळ्या रुपात स्त्री ही त्या संस्कारित घराची लक्ष्मी म्हणुन उदयाला येत गेली. पण समाज रचनेच्या