Posts

Showing posts with the label Travel stories

जोतिबाचा आशीर्वाद... India on Wheel (Travel Stories 2)

 उदगिरीमध्ये भाविकांना पिण्यासाठी पाण्याची सोय केली. त्यासोबतच अद्वितीय शक्तीचा अनुभव घेवून मी पुढील प्रवासाला निघालो. आतापर्यंत जवळपास सर्व मोह, माया, राग, द्वेष संपला होता. मुळातच माझी पेशन्स पातळी खुप जास्त आहे. परंतु एक तोटा पण आहे. सहन करून वाढलेली शक्ती तितक्याच ताकतीने बाहेर पडते. बरेच वेळेस असा रोष समोरचा व्यक्ती सहन करतोच असे नाही. बाहेर पडताना जवळपास दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू सोबत ठेवल्या होत्या. त्यामध्ये वाचनासाठी पुस्तके, झोपण्यासाठी अंथरूण पांघरूण, तसेच सर्व डिजिटल गोष्टी सोबत होत्याच. कॉम्प्युटर, कॅमेरा, मोबाईल, सर्व प्रकारचे चार्जर, तसेच या सर्व गोष्टींना पर्यायी व्यवस्थाही सोबत घेतली होती.  उदगिरी मधून खाली पायथ्याला कोकरुड मध्ये आल्यानंतर देणगीदारांचे आणि सर्व्हिस प्रोव्हायडरचे पेयमेंट करेपर्यंत 4 वाजून गेले होते. रात्रीचा मुक्काम करण्याचे ठिकाण शोधताना जोतिबा समोरच दिसला. म्हणालो की आलोच आहोत तर कुलदैवत जोतिबाचा आशीर्वाद घेवून जावे. जवळपास 7 च्या आसपास मी डोंगरावर पोहचलो.  जोतिबाच्या डोंगरावर पार्किंग मध्ये गाडी पार्क करून भाजीपाला घेवून आलो. हा माझ्य...

उदगिरीचा वाघ.... India on Wheel (Travel Stories 1)

 रात्री ९.३० ते १० च्या आसपास किर्र झाडीतून वाट काढत मी चांदोलीच्या जंगलातुन मंदिराकडे चाललो होतो. जंगलातली झाडी इतकी गर्द आणि दाट होती की दाट हिरव्या गवतातून काळा कुट्ट साप सळसळत निघाला आहे असा डाबरी रस्ता होता. मधुनच घुबडाची आरोळी, रातकिडयांच्या किरकिरीला तडका देत होती. पहाटे पहाटे ३ वाजता पुजाऱ्याने अभिषेकासाठी आलेल्या भाविकाला आवाज द्यायला सुरुवात केली तेंव्हा कळले की हे लोक सर्व तयारी करून दैनंदिन देव पुजा आटोपून भाविकांच्या श्रद्धेप्रमाणे त्यांच्या त्यांच्या पुजा अर्चा करत आहेत.  ६ वाजेपर्यंत माझे प्रातःविधी आटोपुन देवींची आरती ऐकत ऐकत चहापान केले आणि इकडे तिकडे फिरत होतो. ८ वाजेपर्यंत सर्व फिरून फिरून पुन्हा गाडीत बसलो आणि पलंबरची वाट बघत कधी डुलकी लागली कळलेच नाही.  साधारण ९ वाजता गाडीला कोणतेतरी जनावर घासत आहे असे वाटले. गाडी बऱ्यापैकी म्हणजे जानवण्याइतकी अजून व्यवस्थित सांगायचे झाले तर PK मधील डान्सिंग कार प्रमाणे हलत होती. सुरुवातीला झोपेत असल्यामुळे दुर्लक्ष केले मात्र बराच वेळ परिस्थिती मध्ये बदल झाला नाही म्हणून उटून पाहायचा प्रयत्न केला पण.....  माझी झ...

मेरे हिंदु होने पे गर्व महसूस करु, या उसके हिंदू होने पे घृणा। .... India on Wheel (Travel Stories)

Image
मेरी भारत दर्शन की प्रवास के दौरान सेहत खराब होने के कारण गीता कुटीर, बासवारा मे लगबग 4 दिन रुखा हुआ था | गीता भवन, ऋषिकेश का हिंदु संस्कृति का अनुभव देखते हुए में अगस्तमुनि से रोड के अगल बगल गीता कुटीर ढूंढते ढूंढते गीता कुटीर पहुंचा।  मेरी सेहत बहुत खराब थी की मुझे बिलकुल चला नही जा रहा था। विश्वास कर के मैने साधु जी से रहने और खाने के बारे में मदद मांगी। साधु जी ने मुझे पुछा, खाना दिया। अगले दिन साधुजी वृंदावन चले गए।  साधु जी ने मुझे रहने के लिये एक पुराना रूम दिया जो की पिछली बाढ मे बहते बहते बचा हुआ था | मेने भगवान का प्रसाद समझके उसी जगह पे खाना खाया और आराम किया । जोरो की बारिश, बादलों की गुरहाहट, नदी का बहाव ये सब कम था की रात भर चूहों की भागदौड़... एक पल के लिए मुझे तो सच में ऐसे लगा की भोले बाबा मेरी परीक्षा ले रहे हैं। दोनों राते मैने goldmines की मुव्हिज देखके गुजारी और दिनभर सोते हुए निकाले।  तीसरी रात मैंने जैसे तैसे निकाली और चौथे दिन सुबह निकलने लगा तो यहां की राजेश शर्मा नाम की इंसान ने मुझे हर दिन के 1 हजार से 4 हजार पे करने को कहा । मेरे दिमाग में था क...