जागतिक ग्रामीण महिला दिवस
उद्या (१५/१०/२०१८) *जागतिक ग्रामीण महिला दिवस* आहे. यादिवशी ज्या गावांमध्ये यापुर्वी प्रशिक्षण झाले आहे किंवा चालु आहे किंवा नव्याने गावाची सुरुवात करावयाची आहे अश्या ठिकाणी छोटा जनजागृती कार्यक्रम राबवला जावा. देशाच्या स्तरावर दिल्लीमध्ये आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात प्रोत्साहनात्मक कार्यक्रम राबविले जात आहेत. यामध्ये देशातील अभ्यासक, संशोधक, शेतकरी, उद्योजक अश्या गटातील १०० महिलांना निमंत्रण दिले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती, पशुपालन, दुग्धव्यवसाय, मासेमारी आणि इतर शेती संलग्न उद्योगातील महिला शेतकऱ्यांचे प्रश्न, आर्थिक सहाय्य, व्यवसायातील अडचणी आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर परिसंवाद घडवून आणला जात आहे.
महाराष्ट्राच्या सन २०१७-१८ च्या अहवालात शेतीचे GDP मध्ये १२.२% योगदान आहे मात्र ५०% पेक्षा जास्त लोक शेती व आधारित उपजीविका व्यवसायावर आधारित करतात. *इथे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो कि, या ५०% मध्ये लोकांमध्ये ७०% महिला आहेत. दलित, आदिवासी, पारधी, भटके अश्या समाजाच्या महिलांचा समावेश आहे. देशाच्या इतिहासात सन १९९५ ते २०१६ या काळात महाराष्ट्रात ७०००० (७० हजार) शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यामधील ९०% आत्महत्या या पुरुषांनी केलेल्या आहेत. या शेतकऱ्यांच्या पाठीमागे त्यांच्या विधवा महिला घराची आणि शेतीची जबाबदारी सांभाळतात. यामध्ये सर्वाधिक आत्महत्या झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील १४ जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे.*
This image is for indication purpose only. |
शेतीमधील संकटे आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीसाठी शासकीय स्तरावर मागील १८ वर्ष्यांच्या कालावधीत विविध विभागांचे मार्फत २४ विविध शासननिर्णय निघाले. *गावात आपण विकासासाठी वर्षानुवर्षे काम करीत आहोत. ICICI DIGITAL VILLAGE मधील लाभार्थी प्रशिक्षणार्थी गटामध्ये उत्साह वाढवण्यासाठी सहभागी घटक आणि त्यांच्यावर काम करणाऱ्यासाठी खालील उपक्रम घेता येतील.*
१) गावात सार्वजनिक ठिकाणी स्थानिक गणपती व नवरात्रोत्सव मंडलातील तरुणांना घेऊन शासकीय महिला अधिकाऱ्यांचा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करावा म्हणजे गावच्या विकासासाठी चळवळ उभी करण्यासाठी उत्स्फुर्त प्रतिसाद भेटेल.
२) गावातील महिला उद्योजिकांचा सन्मान करावा म्हणजे नवीन प्रशिक्षणासाठी उत्स्फुर्त प्रतिसाद भेटेल.
३) प्रशिक्षणानंतर उत्तम व्यावसायिक कामगिरी केलेल्या प्रशिक्षणार्थींचा सन्मान करावा म्हणजे नवीन व्यावसायिकांना प्रोत्साहन भेटेल.
४) प्रशिक्षणासाठी १००% उपस्थिती असणाऱ्या महिलांचा सन्मान करावा म्हणजे नवीन प्रशिक्षणासाठी जास्तीत जास्त उपस्थिती भेटेल.
५) प्रशिक्षणाच्या माध्यमातुन तयार झालेल्या विक्रीयोग्य पदार्थांची / वस्तुंचे प्रदर्शन ठेवा म्हणजे नवीन प्रशिक्षणार्थी व्यावसायिकांना प्रोत्साहन भेटेल.
*अंतिम ध्येय गावस्तरावर अधिकाधिक प्रमाणात शाश्वत व्यवसाय शृंखला उभी रहावी. गावची अर्थव्यवस्था गावस्तरावर बळकट व्हावी.*
#IDV #livelihood #employment #policy #design #development #livelihood #womenempowerment #women #womensfashion #womenpower
Comments
Post a Comment