कोरोना व्हायरस काय करतो ? न्युमोनिया ? - डॉ. नितीन पाटणकर


*१) कोरोना व्हायरस काय करतो ? न्युमोनिया ?*

*नाही. या व्हायरसमुळे न्यूमोनिया होत नाही. कोरोनामुळे  फुफुसात जे काही होते, आपण त्याला न्यूमोनिया समजून उपचार करीत राहतो हे कदाचित चुकत असावे.* 

*SARS2 Corona व्हायरस हिमोग्लोबिनला चिकटून बसतो.*

*त्याला झटकून टाकण्याच्या प्रयत्नात लोहाचे कण (ions) सुटे होऊन रक्तात मिसळतात.*

*त्या मुळे हिमोग्लोबिन पुरेसा ऑक्सिजन वाहून नेउ शकत नाही.*

*शरीरातील महत्वाच्या आणि मोठ्या अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू लागतो.* 

*उपचारानंतर ऑक्सिजनचा पुरवठा वाढवला तरी त्याला वाहून नेणारे हिमोग्लोबिन कोरोनाच्या विळख्यात असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा झपाट्याने वाढत जाऊन अनेक अवयव एकाच वेळी निकामी होतात. याला Resistant Hypoxia with Rapid Multi-organ Failure असे म्हटले जाते.*

*रक्तातील वाढते लोहकण हे इतके मारक असतात की त्यांच्यामुळे फुफुसांना तीव्र इजा होते. या इजा होण्यामागे फुफुसातील ऑक्सिजन आणि रक्तातील लोहकण यांची रिॲक्शन जबाबदार असते. याला Powerful Oxidative Damage म्हटले जाते.*

*कुठच्याही जंतुसंसर्गात, जर फुफुसांचा संसर्ग असेल तर न्यूमोनिया होतो. पण सुरवातीस तो  डावीकडे किंवा उजवीकडे; एकाच बाजूस आणि असमान असतो. कोरोना मध्ये ऑक्सिजन आणि लोहकणाच्या लढाईत फुफुसांचे कुरुक्षेत्र झाल्याने प्रत्येक वेळी दोन्ही फुफुसांना मोठ्या प्रमाणात इजा होते, जी ‘सी. टी.’  स्कॅन वर दिसते. याच वर्णन Bilateral Ground-glass Appearence असे केले जाते त्याला दुसरी उपमा नसल्याने त्याला Bilateral न्यूमोनिया समजून उपचार दिले जातात.* 

*आता हिमोग्लोबिन कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे  पुढील परिणाम बघू.*

*ऑक्सिजन कमी पडतो आहे हे जाणवून शरीर हिमोग्लोबिन तयार करण्याची गती वाढवते. (म्हणून कोरोना  बाधितांमध्ये हिमोग्लोबिन जास्त दिसते)*

*रक्तातील सुटे लोहकण  आणि त्यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांचा पुन्हा वापर किंवा निचरा करण्यासाठी शरीरातील ferritin हे द्रव्य वाढते. (कोरोनाच्या पेशन्ट मध्ये म्हणूनच रक्तातील चाचण्यांमध्ये ferritin खूप जास्त प्रमाणात दिसून येते).*

*मलेरियामध्ये वापरले जाणारे क्लोरोक्वीन किंवा सध्या चर्चेत असलेले हायड्रॉक्सि-क्लोरोक्वीन ही औषधे मलेरियाच्या जंतूंपासून हिमोग्लोबिनला वाचवण्याचे काम करते, तसेच ते कोरोना व्हायरसपासून  हिमोग्लोबिनला वाचवित असावे.*

*अजूनही कोरोनाचे विषाणू हिमोग्लोबिनपासून वेगळे कसे करायचे हे आपल्याला ठाउक नाही. (पेशन्टला अगदी व्हेंटिलेटर मधून जरी ऑक्सिजन पुरवला तरी तो ऑक्सिजन पुढे न्यायला पुरेसे हिमोग्लोबिन नसेल तर त्या ऑक्सिजन मुळे फुफुसांनाच जास्ती इजा होऊ शकते. आज आपण जे व्हेंटिलेटर वापरण्याचे नियम (protocol) पळतोय ते न्यूमोनिया किंवा 'ए.आर.डी.एस.' साठी बनवलेले असल्याने ते कोरोना बाधितांसाठी फायदेशीर ठरत नसावेत असा संशय काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.*  

*यावर अजून संशोधन होईलच. आजतरी कोरोनाने संपूर्ण जगाला एक मोठे कोडे घातले आहे हे नक्की. गोष्ट इथेच संपत नाही. वाढत्या लोहकणांमुळे लिव्हरवर ताण पडतो आणि तब्येत फार झपाट्याने बिघडू लागते.  हिमोग्लोबिनची  परिणामकारकता कमी होत जाणे, रक्तातील लोहकण वाढत जाणे आणि महत्वाच्या अवयवांचा ऑक्सिजन पुरवठा कमी होणे यामुळे फुफुसांसोबत इतर अवयव निकामी होत जातात हे आपण बघितले.*

*आता आपण यासाठी आहारात काय बदल करू शकतो हे पाहूया...*

*शरीराची कोरोनाविरोधी शक्ती वाढविण्यासाठी फळे, भाज्या यांचा वापर आणि प्रथिने पुरेशा प्रमाणात घेणे हे उपाय आपण करतोच आहोत. त्या बरोबरीने खालील बदल करायचे आहेत.* 

 

*अ] लोहकणांपासून सुरक्षा*

*१) लिंबू फ्रीझर मध्ये ठेवून ते घट्ट झाले  की  ते सालीसकट किसून घेणे. त्यात मीठ टाकून त्याचे सरबत घेणे. माणशी एक लिंबू तरी सालीसकट पोटात घेणे.* 

*२) हळकुंड मिळाल्यास त्याची पावडर करून किंवा मग तयार हळद घेऊन दिवसभरात निदान एक चमचा हळद गरम पाण्यातून पोटात घेणे.*

*३) आपला साधा चहा, आले घातलेला चहा हाही उपयोगी पडतो.*

*या तीन गोष्टी अजूनही सहज मिळतात. यातील काही औषधी द्रव्यांमुळे सुटे लोहकण शरीराबाहेर टाकायला मदत होते. तसेच ऑक्सिजनमुळे होणारी इजा होण्यापासून सुरक्षा मिळते. या सोबत काही अन्न- औषधे ( Nutraceutical ) उपयोगी पडू शकतील  उदा. पिकनोजेनॉल, कुटकी , कुरकुमिन इत्यादी.*

*ब] महत्वाच्या अवयवांना कमी ऑक्सिजनमध्ये काम चालू ठेवण्यास मदत करणे. बीटरूट, पालक आणि कोबी यांचा रस (स्मूदी) लसणीचा मुबलक वापर  भेंडीच्या, भोपळ्याच्या किंवा कलिंगडाच्या बिया दोन चमचे दिवसभरात पोटात घेणे.*

*या सोबत काही अन्न- औषधे ( Nutraceutical ) उपयोगी पडू शकतील  उदा. arginine, CoQ 10*

*कोरोना काय करतो याची जी माहिती समोर येत आहे त्या माहितीच्या आधारे ‘विस्डम क्लिनिक’ तर्फे वरील  आहार सुचवले आहेत. यात कोरोना ज्या जागी वार करतो तिथे सुरक्षाकवच देण्याचा प्रयत्न आहे. फळे खा, भाज्या खा, प्रोटीन्स घ्या. या ज्या जनरल सूचना असतात त्यांना पर्याय म्हणून नाही तर पूरक म्हणून या सूचना आहेत.*

*माझ्या नावासकट या जरूर शेअर करा. कुणालाही काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. खासकरून युरोप आणि अमेरिकेत जर तुमचे कुणी मित्र, नातेवाईक असतील तर त्यांना ही माहिती जरूर कळवा. तिथे या माहितीची जास्त गरज आहे आज. त्यांच्या डाॅक्टर्सना जरी प्रश्न असतील तरी त्यांच्याशी मी बोलीन. आज जसे जमेल तसे हे कोरोनाचे संकट परतवून लावायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाचा जमेल त्या प्रकारे एकमेकांना मदत करायची आहे.*


*डाॅ. नितीन पाटणकर एम्.डी.*

*Consultant in Diabetes, Obesity, Dharana and Sound Therapy*

*@Wisdom Clinics and Jupiter Hospitals*

*#corona #covid19 #lockdown*

Comments

Popular posts from this blog

Corporates & CSR project implementation

The Imperative of ESG Reporting in Corporate Practices - Mahesh Borge, CSR COnsultant

WHAT WENT WRONG ???