बाबर सागरच्या दिशेने... (मध्यप्रदेश)

मी आणि दत्ता (कोल्हापूर) त्याच्या बायकोसोबत तासगांव मध्ये पोहचलो. हा दत्ता म्हणजे पुर्वी जेंव्हा मी कृषि विभागाच्या सेवेत काम करायचो तेंव्हाचा खास दोस्त... काही प्रासंगिक कार्यक्रमामुळे आम्ही तासगांव मध्ये थांबलो होतो. ऐतिहासिक काळापासून चालत आलेल्या परंपरेप्रमाणे आणि प्रत्येक घरातील वादांप्रमाने आमच्या सावळजच्या बोर्गे घराण्यात पण नेहमीप्रमाणे घरगुती वाद सुरू झाले होते, काहींना संपत्ती पाहिजे होती, तर काहींना मान. काहींना तर माहितच नव्हते की त्यांना पाहिजे काय. यामध्ये किंवा अश्या गोष्टींमध्ये आमच्या छोट्या आई आणि मोठ्या आई यांचा सहभाग असतोच असतो. ही आमच्या बोरगे घराण्याची परंपरा म्हणाला तरी चालेल. 

आपला सहभाग असावा किंवा किमान गृहीत धरले जावे म्हणून मी एका काटीच्या सहाय्याने काही मोजणीची मापे टाकत होतो त्यावर मोठी आई मला विनाकारणच हिणवत होती. वास्तविक प्रधान पुरुषाच्या मृत्यूनंतर यथोचित संस्कार करून सत्ता हस्तांतरित होणे अपेक्षित होते. मी पण गेली दीड दोन तपे होईतोपर्यंत वाट पहात पहात साम्राज्याचे यथोचित संरक्षण करत होतो. हे करण्यासाठी मी आकाशपाताळ एक केले होते. एकाच वेळी तीन तीन शत्रूंशी तोंड देणे ते पण आर्थिक व सामाजिक स्थैर्य जपून. या संपूर्ण काळामध्ये माझापण भीष्म पितामह होणार आहे याची पुसटशी देखील कल्पना माझ्या ध्यानीमनी आली नव्हती. 

आज मोठ्या आईसाहेबांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळीच खुनशी धार आली होती. हा अवतार पाहून रागाने मी तिथून पाय आपटत आपटत निघालो, आणि पाहतो तर काय? तिथे दत्ताचे बाळ !!! 

हा तोच दत्ता जो एकेकाळी माझा परममित्र होता, त्याकाळात तो आमच्या बहिणाबाईंच्या संपर्कात होता. तो माझ्या प्रस्थानानंतरही तासगांव परिक्षेत्रात वास्तव्यास होता याची मला जाणीव होती. पण आजच्या त्याच्या चिरंजीवांच्या या भयानक खुनी हल्ल्यानंतर मला या परम मित्रावर विश्वास ठेवणे अवघड जात होते. या मध्यंतरीच्या गतकाळात दत्ताच्या परिवाराचा झालेला उहापोह ऐकुन होतो मी. पण त्याचा मुलगा आज असे कृत्य करेल याची तसुमात्र कल्पना, मला काय कोणालाच नव्हती, नव्हे येणारच नाही. 

किती लहान अजाणते बाळ ते, माझ्या अंगा -  खांद्यावर खेळलेले.... आज संपुर्ण लहूलुहान झालेले... एक क्षणासाठी तर असे वाटले की त्या बाळावरच हल्ला झाला आहे आणि ते वाचविण्यासाठी माझी वाट पहात बसले आहे. त्याच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. त्याच्या अंगाला संपुर्ण रक्त लागलेले होते. ते टिप... टिप... टिप... करत खाली पडत आहे. तिथली सर्व जमीन रक्तरंजित झालेली आहे. भयभीत झालेलो मी दुरूनच लक्ष देऊन पाहू लागलो. पाहिले तर ते त्याचे रक्तचं नव्हते.

सर्रकन एक लहर पायातून डोक्याकडे गेली आणि मी भानावर आलो. सर्वजण एका वेगळ्याच संकटात सापडलो होतो ते कळायला बराच वेळ निघुन गेलेला होता. या मध्यंतरीच्या काळात परकीय शक्ती चांगल्याच फोफावल्या होत्या. एखादे परकीय आक्रमण असते तर ते समोरासमोर होणारे युद्ध आणि त्याचे परिणाम समजणे सोपे होते. पण या अजाणतेपणाचे सोंग घेतलल्या आंतरिक शक्ती रोखायच्या तरी कश्या??? सर्वत्र गडबड आणि गोंधळ सुरू झालेला. मी त्या अजानत्या बाळाच्या रूपातील दानवाचे कृत्य प्रत्यक्षात पाहिले होते. नेहमीप्रमाणे सर्वांना सांगितले पण आजही माझे कोणी ऐकले नाही. कोणीही विश्वास ठेवला नाही. 

अश्या परिस्थितीमध्ये प्रवाशाचे सोंग घेवून मी बाहेर पडलो. बाहेर आर्मीची प्रात्यक्षिके आणि शारीरिक कष्टाचे खेळ सुरू होते. कदाचित ते प्रशिक्षण चाललेले असावे. नंतर समजले की हा छुपा आर्मीतळच आहे. मला कल्पना नव्हती की हा तळ आमचा आहे की परकियांचा... तरीही पुढचा मागचा विचार न करता मी पण त्यामध्ये सहभागी झालो. माझ्यासोबत माझे काही विश्वासू साथीदार त्यामध्ये दिपक, त्याचा भाऊ रवींद्र, माझ्याच वयाच्या 2- 3 स्त्रिया, पराग, सनी तसेच इतरही अनेक जण सहभागी झाले होते. माझा उद्देश एकच होता की आज घेतलेले ट्रेनिंग आज न उद्या कुठे ना उपयोगी येईलच. आणि याच अपरिहार्य कारणामुळे आम्हा सर्वांचे छुपे आर्मी ट्रेनिंग सुरू झाले. 

त्यामध्ये घेतले जाणारे ट्रेनिंग माझ्यासाठी अतिशय साधे वाटले. एक रनिंग साधारण पण किचकट लक्ष दिले होते. तिथे जाताना विचार करून वेडा टाकायचा होता जेणेकरून पलिकडच्या फांद्या लागणार नाहीत आणि कमी परिश्रमामध्ये वेडा पुर्ण होईल. बरेचजण शॉर्टकटच्या नादात जखमी होऊन बाहेर पडत होते. किमान लॉजिक लावायचे साधे प्रयास कोणाकडून केले जात नव्हते. मी ते पुर्ण करुन आलो. हे लक्ष पुर्ण करणाऱ्यांना लष्करी बॅकपॅक दिली गेली. प्रशिक्षणामध्ये आम्हाला जी बॅकपॅक दिली गेली ती पाहून मला कल्पनेच्या पलीकडे आनंद झाला. मी सर्वांना ते दाखवत होतो. मला माझे लक्ष साधण्यासाठी जशी अपेक्षित होती अगदी तशीच होती. जसे की त्यामध्ये खालील बाजूस एक छुपा कप्पा होता त्यामध्ये एक्स्ट्राचे साहित्य ठेवता आले पाहिजे. जे की कोणाच्या लक्षात सहजासहजी येणार नाही. बॅग कॉम्पॅक्ट होती... लगभग 40 ते 50 लिटरची असावी.

मी हे सर्वांना सांगत होतो की तोपर्यंत एक सार्जंट आला आणि मला घेवून निघाला. तो काहीच सांगत नव्हता. परिणामी त्याचा आणि माझा वाद सुरू झाला होता. तोपर्यंत दिपक माझ्याकडे आला. त्याने मला सांगितले की काल शारिरीक कौशल्याच्या क्लास नंतर सर्व ऑफिसर चर्चा करत होते की त्यांना अजूनपर्यंत एकही असा व्यक्ती भेटला नाही की ज्याच्यावर विश्वास ठेवून हे काम सांगता येईल. मी त्यांची व्यथा पाहून तुझे नाव सुचवले होते. कदाचित आजची स्पर्धा आणि आता तुला घेवुन जाणे याचे काहीतरी रिलेशन आहे. यावरून माझ्या लक्षात आले की सार्जंट माझ्याकडे येण्याअगोदर काहीतरी शोधत होता. त्याच्या हातात लाल रंगाची एक चिट/ रीसिट चा तुकडा होता. तो आताही त्याच्याजवळ होता. हा तो त्याच लेटर चा भाग होता जो काल सर्व ऑफिसर चर्चा करत होते. त्या लेटर वर बाबर, अथवा सागर, मध्यप्रदेश असे काहीसे लिहलेले असावे, असे आठवते. 

एकंदरीत मध्यप्रदेशातील बाबर / सागर येथे माझ्यासाठी काहीतरी नियोजित केले आहे याचा अंदाज आला. आता मला वाट पाहायची होती की कोण कोण काय सल्ला देतेय किंवा कसा स्टंट घेतेय. आता फक्त मला प्रवाहा सोबत जायचे आहे. 

तिथून आम्ही निघालो, इकडे तिकडे करत संध्याकाळपर्यंत मिरजेला पोहचावे लागणार याचा अंदाज आला होता, आता फक्त सार्जंट ने सांगायचा अवकाश होता. जाताना रस्त्यावर लहान कुत्र्यांची पिल्ले भटकताना दिसली त्यातले एक पिल्लु बहुतेक गाडीखाली आले होते. थोडेसे अस्तित्व रस्त्यावर पसरलेले दिसत होते. ते कुत्र्याचे पिल्लु होते हे त्याच्याबाजुला बसलेल्या त्याच्या आईच्या ओल्या डोळ्यातील दुःखाश्रु नी सांगितले अन्यथा या रस्त्यावरच्या माणसाच्या जंगलात इतर प्राण्यांना मोल काही राहिले नाही हे पूर्वीच समजले होते. मी जाणीपूर्वक दुर्लक्ष करून पुढे निघालो. अगदी एक हाकेच्या अंतरावर गेलो असेन इतक्यात एक पशू विभागाची गाडी गेलेली दिसली. हा निव्वळ योगायोग नक्कीच नव्हता. सर्व पिल्ली आणि त्यांची आई सुखरूप त्यांच्यासाठी योग्य असलेल्या ठिकाणी पोहचले. अपवाद एक पिल्लु देशाच्या कामी आले असावे अशी मनाची समजुत काढून मी पुढे निघालो. बाबर/ सागर च्या दिशेने..... 

आपण मनुष्य पण अगदी त्या कुत्र्यासारखे आयुष्य अपेक्षित करतो. भले त्या पिल्लासारखे मरण आले तरी चालेल पण रूढी, परंपरा, चालीरीती माझा गाव, माझे गाववाले या मोहपाशात आयुष्य संपवून टाकतो. स्वतःच्या गुणांना ओळखणे आणि त्या गुणांची गरज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोहचणे आपले कर्तव्य आहे. स्वतःचे गंतव्य आणि कर्तव्य समजले की आपणच नाही तर आपल्या भविष्यातील येणाऱ्या पिढ्या देखील नाव काढत राहतील. नाहीतर आम्ही देशमुख आहोत आणि 9 व्या शतकात तत्कालीन विजापूर येथे आमची सत्ता होती हे आम्ही आजपण गर्वाने सांगतोच की.... 
.
.
.
क्रमशः 

 

Comments

Popular posts from this blog

Corporates & CSR project implementation

The Imperative of ESG Reporting in Corporate Practices - Mahesh Borge, CSR COnsultant

WHAT WENT WRONG ???