Posts

Showing posts from 2025

मन आकाशासारखे विशाल ठेवा – वैकुंठाचा मार्ग खुला होईल

आकाशाच्या उंचीवरून दिसणारा स्वर्ग आणि कैलासाचा मार्ग आपले मन आकाशाप्रमाणे विशाल आणि सर्वांना सामावून घेणारे असावे. जसे आकाश कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येकाला आश्रय देते, तसेच आपल्या मनातही प्रत्येकासाठी जागा असावी. जेंव्हा आपण या दुनियेच्या मोह-भ्रमांपलीकडे एका असीम उंचीवर पोहोचतो, तेंव्हा रोजच्या जीवनातील संकटे, दुःख आणि अडचणी अगदी क्षुल्लक वाटू लागतात. तुकाराम महाराज आणि वैकुंठाचा मार्ग संत तुकाराम महाराजांनीसुद्धा हा मार्ग अनुसरला. त्यांचे भजन, कीर्तन आणि विचार यामधून ते नेहमीच अध्यात्मिक उंची गाठण्याचा संदेश देत राहिले. शेवटी, लोकश्रुतीनुसार, ते आपल्या दैवी भक्तीच्या जोरावर आकाश लोकात, अर्थात वैकुंठात गेले. हा प्रवास फक्त एका साधूचा नव्हता, तर तो एक संकेत होता – की जो मन, विचार आणि कर्माने शुद्ध होतो, तो या संसारीक मोहांपासून मुक्त होऊन दिव्य उंची गाठू शकतो. आकाशाच्या उंचीवरून दिसणारा सत्याचा मार्ग आपण कधी विमानातून प्रवास केला असेल, तर जाणवते की जमिनीवर असताना वादळे, ढग, आणि गडगडाट दिसतो. पण जसे विमान त्या ढगांच्या वर जातं, तिथे एक वेगळंच शांत, निर्मळ आकाश असतं. हेच जीवनाचं सार आ...

'let it go' is a powerful chant. It makes you more light, so you can fly high...

कितीही जपून वागलं तरी काही लोक फक्त आपल्या चुकाच पकडायला बसलेले असतात. म्हणजे आपल्या ध्यानी मनी नसलेल्या गोष्टींनी सुद्धा कोणी दुखावून घेत असतं. माणसं नेहमीच महत्त्वाची वाटतात आपल्याला म्हणून आपण दरवेळी स्पष्टीकरणं देत राहतो. कधी चटकन माफीही मागून टाकतो (आपल्या इगोपेक्षा माणसं महत्त्वाची हे तत्त्व डोक्यात ठेवून). पण हे सतत घडत राहील तर पोरखेळ होऊन बसतो आयुष्याचा. जपून तरी किती वागावं नेहमी? मग भीती तयार होते नात्यांत एक अदृश्य! अरे आपण थोडंसं जरी चुकलो तरी आपल्याला कोणी झाडणार. किंवा सतत ही देखील टांगती तलवार राहते डोक्यावर, की आपल्याकडून नकळत काही गोष्ट घडली, जिच्यामागे कोणाला हेतूत: दुखावण्याचा उद्देश नसला तरी कोणी आपल्याबद्दल गैरसमज करून घेणार आहे, आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार आहे. ही भीती मोठाल्या भिंती उभ्या करते नात्यांत. आतून तुटण्याची प्रक्रिया कधीच सुरू झालेली असते, तरीही आपण चिवटपणे तगून राहिलेलो असतो नात्यात, धरून असतो आपल्या माणसांना. (कारण आपल्याला आयुष्यातलं माणसांचं मोल फार अधिक वाटलेलं असतं.)    पण उंटाच्या पाठीवर शेवटची काडी कधीतरी पडतेच. असह्य होतात...