आकरंदन - महेश बोरगे

रात्रीचे 3 वाजलेत आणि त्या भयाण शांततेत माझा फोन खणा-खणा घंटानाद करू लागला. तसे आता मला फोनची सवय झाली आहे.... दिवस आणि रात्र माझ्यासाठी वेगळी नाही. तरीही अनोळखी नं.वरून आलेला फोन थोडा विचार करायला भाग पाडतोच... 

फोन उचलून हॅलो म्हणायची संधी न देताच पलीकडून एक मुलगी घाबऱ्या आवाजात बोलली.... 

महेश सर मुझे यहा से ले चलो, मैं काफी परेशानी मे हुं।। 

आवाज परिचयाचा वाटला आणि अंगावर सर्रर्रकन काटा आला. मन त्या भयाण रात्रीच्या अंधारात सैरावैरा धडपडू लागले.... 

आज पुन्हा नभ दाटुन आलेत. पावसाचे वातावरण तर नेहमीच होते पण आजचे वातावरण काही विचीञच आहे. सकाळपासुन मनावर मळभ दाटले आहे. सकाळी- सकाळी तिने खुप ओरडुन उठिवले. तिला मी सांगितले होते, उद्या काही काम नाही. तरीही उठिवले, त्यामुळे उठल्यापासुन माझी थोडी चिडिचड चालु झालेली.... रात्रभर काम करायचे आणि सकाळी सकाळी किरकिर.... 

ब्रश करताना, ती म्हणाली, "थोड्या वेळापुर्वी पप्पांचा फोन आलेला..., त्यांनी मला घरी बोलिवले आहे." एक दीर्घ श्वास घेऊन थोडा आवाज चढवुन म्हणाली, "तरी मी सांगत होते..., माझे वागणे बदलायला नको. मी जरी मॉडर्ण जमान्याची असले तरी माझ्या सभोवताली जुन्या विचाराचे, जुन्या पद्धतीचे, जुन्या रुढींचे, जुन्या परंपरेचे लोक आहेत त्यांना माझे वागणे पटत नाही. माझ्याविषयी त्या लोकांच्या मनात कटुता आहे पण तु कधी माझे ऐकले आहेस का? मला नाही मनासारखे वागता येत" ..... 

तिचे बोलणे चालू होते आणि मी माझ्या विश्वात ढकलला गेलो, काय चुकतेय माझे??? मुलींनी त्यांच्या पायावर उभे रहावे, त्यांना गरजेनुसार शिक्षण मिळावे, त्यांचा आत्मविश्वास निर्माण व्हावा... हे चुकीचे आहे का? मला मिळणारे उत्पन्न पाहता मी सर्वांना पुढे घेऊन जाऊ शकत नाही हे लक्षात येते पण जितके आहे त्यामध्ये जर शक्य असेल तर का मदत करायची नाही.??? 

तिच्या बोलण्यात एक वेगळीच तडफड जाणवत होती. एव्हाना माझा ब्रश करुन झालेला.... मी तिला विचारले "काय म्हणाले पप्पा?" आणि इतका वेळ तिने आवरुन धरलेला अश्रुंचा बांध मोकळा झाला. ती काही बोलेना, फक्त हुंदका, हुंदका आणि मनाचे आकरंदन....  मी तिला सावरत होतो.... 

डोळे पुसत पुसत म्हणाली, "काही नाही, घरी बोलिवले आहे. पप्पांच्या मिञांचा मुलगा मला पहायला येणार आहे." मी म्हणालो, "ठीक आहे, जा तु.... सर्व पाहण्याचा कार्यक्रम झाला की मला संपर्क कर" तिला काय वाटले मला कळाले नाही. तिची वाणी जहाल झाली होती. नंतर काहीही न बोलता, काहीही न विचारता ती निघुन गेली. पण वीजेचा झटका बसलेप्रमाणे तीने माझा फोन ठेऊन बाजुला झाली. 
.
.
आता ती तिच्या घरी आहे, फोनवर खुप बोलत असते. तिच्या बोलण्यातुन मला जाणवते आहे, तिला घरी बसुन कंटाळा आला आहे. त्यामुळे फार कष्टाने पुन्हा तिचे मत परिवर्तन करुन नोकरी करण्यास भाग पाडले. घरापासुन 1 तासाच्या अंतरावर ती एका फार्मसी कंपनीत नोकरी करु लागली. दिवसभर बोलणारी ती आता मला फक्त सकाळी आणि संध्याकाळी बोलु लागली तोही प्रवासात असताना... जिथे तिला कधीच मनमोकळेपणे बोलता येत नव्हते. 
.
.
तिची अडचन समजुन घेवुन मी सकाळी तिच्याबरोबर उठुन तिला वेळ देवु लागलो पण पुर्वीची सवय जात नव्हती. या सर्व गोष्टींमुळे माझी चिडिचड वाढली. तिला हे जाणवत होते की नाही ते मला कधी कळाले नाही. अाता ती मला टाळु लागली होती, मला जाणवत होते पण नेहमीच मी तिचा विचार केल्यामुळे या बाबतीत तिला कधी फोर्स केला नाही. 
काहीच कळेना... दिवसा मागून दिवस जात होते. एक एक दिवस ती दूर जात होतो. कळत नकळत कधी आणि कसे अंतर पडत होते समजले नाही. हळूहळू आमचे फोनवरील संभाषण पण कमी होत गेले... 
.
.
आणि आज तिचा मला पुन्हा एकदा फोन आला आणि रात्रीचे 3 वाजता त्या भयाण शांततेत म्हणाली...
.
महेश सर मुझे यहा से ले चलो, मैं काफी परेशानी मे हुं।। आप जो कहोगे मैं करूँगी। मुझे सिर्फ यहा से ले चलो।।।। 
.
.
या मधल्या 1 ते 1.5 वर्ष्याच्या काळात तिचे लग्न झालेले. माझ्या नादाला लागून मुलगी बिघडलीय म्हणून मला न सांगता पालकांनी तिचे लग्न लावून दिले. घरच्यांच्या परिस्थितीला विरोध करू नका. पालक तुमच्या भल्यासाठी सर्व काही करतात म्हणून तिनेही पालकांच्या मताला अनुमती देत लग्न केले. लग्नानंतर काही कारणामुळे छळवाद सुरू झाला आणि आज परिस्थिती या टोकाला पोहचली. ना रहायला घर, ना पुरेसे आर्थिक उत्पन्न, दोघांनी मिळून संसारात हातभार लावावा हे तिचे प्रांजळ मत मात्र पती-परमेश्वराने याचा गैरअर्थ काढून सुरवातीला थोडा त्रास दिला पण उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल तसे भांड्याला भांडे लागत गेले. आई-वडिलांना सांगितले पण त्यांनी आपल्या रूढी-परंपरेने तिला तिच्या दिल्या घरी सुखी(?) राहण्याचा आशीर्वाद दिला. 
.
.
 आणि शेवटी गेली चार महिने तिला एक-दोन दिवसातुन जगण्यापूरते खायला मिळते, जेवणासोबत कधीकधी मार पण मिळु लागला.  नवऱ्याला दारू पिले की जेवायला लागतच नव्हते.
.
.
अशी अवस्था झाली की कोणालाही सांगता येत नव्हते म्हणून मी तुम्हाला फोन केला. आणि शेवटी ही भारतीय नार मला म्हणाली की मला फक्त मन मोकळं करायचं होतं म्हणुन फोन केला. मी जर आत्महत्येचा प्रयत्न केला आणि जर जिवंत राहिले तर मला भेटायला या आणि मला घेऊन जा. 
.
.
.
.
किती समजुतदार पणा.... मला जर देव भेटला तर मी त्याला नक्की विचारीन, का स्त्रीला इतके प्रगल्भ बनवलेस???? 
.
.
नामांकित कंपनीत नोकरी(?) मिळाली की सगळे मिळते असा गोस गैरसमज असणाऱ्या पालकांना कोण समजावणार??? यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहून रोजगार - उद्योगधंदे करणारे युवक का वाईट आहेत??? चार पैश्याची नोकरी करणारा स्थिरस्थावर वाटतो पण त्याच वयात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस करणारा मुलींसाठी योग्य वर वाटत नाही. या पालकांच्या विचाराचे कौतुक वाटते. 
.
.
.
(माझे सहकारी आणि मी आम्ही तिला या परिस्थितीतून बाहेर काढुच पण एक पालक म्हणून तुमचे काय कर्तव्य असेल तर एकदा आपल्या इवल्याशा बाळाला भेटायचे तरी कष्ट घ्यावे ही विनंती. तिला तुमची पण तितकीच गरज आहे.)
.
.
.
नेहमीप्रमाणे ती सध्या काय करते हे माहीत नाही या उत्तराच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही पण एकंदरीत मुलींशी सौहार्दाचे नाते ठेवावे इतकीच पालकांना विनंती. मुली खूप सक्षम आहेत त्यांना काही सांगावे लागत नाही फक्त प्रेमाचे दोन शब्द द्या त्या हिमालय सर करायला कमी नाहीत. 
.
.
या संपुर्ण गोष्टी मध्ये काय घडले असेल? कोण बरोबर असेल? कोणाचे कुठे चुकले असेल? बदल कोणी आणि कसा करावा? 
.
का असे असते? आपली कुटुंब व्यवस्था किती बळकट आहे याचे आपण उदाहरण देत असतो. पण आपल्याच मुलीला काय पाहिजे ते वडिलांना का कळत नाही??? लहानाची मोठी करायची, शिकवायचे आणि एक त्रयस्थाच्या हाती सोपवून द्यायचे??? आणि 100% त्या मुलीने त्या त्रयस्थाच्या स्वप्नांची पाठराखण करायची???? का मुलींना तुम्ही गृहीत धरता??? का मुलींना स्वतःचे आयुष्य जगू देत नाही??? येणाऱ्या काळात मुलींनी बगावत केली तर दोष कोणाला देणार???
.
.
काय झाले असेल पुढे??? 

--
Mahesh Borge

Comments

Popular posts from this blog

Corporates & CSR project implementation

The Imperative of ESG Reporting in Corporate Practices - Mahesh Borge, CSR COnsultant

WHAT WENT WRONG ???