"आनंदवन समाजभान अभियान." - महेश निंबाळकर
अगदी ३ महिन्यांपूर्वी काम कसं करायचं हा प्रश्न घेऊन "स्नेहग्राम" उभारणी वादळ मनात सुरु झालं होतं. एके दिवशी अचानक श्री. कौस्तुभदादा आमटे यांचा मॅसेज आला की, "मी पुण्यात आहे, भेटायला ये." मी दोन दिवसांत पुण्याला पोहोचलो. तिथं बरीचशी चर्चा झाली. तसे "सृजन व्हिलेज" या व्हॉटअप ग्रुपमधून आजवरच्या गरजू व होतकरुंना उभारलेल्या मदतनिधी वा विविध संस्थांना साहित्य वाटप असो, हे सर्व कौस्तुभदादा अगदी जवळुन पहात होते. परंतु या सार्या गोष्टीत तुझ्या प्रकल्पाचे काय? त्याच्या स्थिती काय? तो कधी सुरु करायचा? हा गंभीर प्रश्न चर्चेतुन माझ्या पुढे उभारला. अगदी क्षणाचाही विलंब न करता कौस्तुभदादांनी माझ्या प्रश्नाची उकल केली- "आनंदवन समाजभान अभियान." आपण स्नेहग्रामला मुर्त्यरुप देऊयात, चर्चा झाली अन् अवघ्या ८-१० दिवसांनी कामास सुरुवातही झाली. दरम्यान कोरफळ्याच्या माळावर ना वीज ना पाणी अशी बिकट अवस्था त्यात उन्हाच्या तीव्र झळा. तरीही कसलाही विलंब न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. बोअर मारले त्यास पाणी लागले अन् पाया खोदून टीन शेडच्या उभारलीचे कामही सुरु...