भावना - अव्यक्त भावनांची कहाणी भाग - ०१
ढगांनी दाटी केलेली आणि काही केल्या काळोख हटायला तयार नव्हता. वास्तविक ज्यांच्यावर आयुष्याची डोर ठेवायची त्यांचीच इच्छा नव्हती कि मी जन्माला यावं. का कोणास ठावूक पण या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कारण असतेच असते. मी जन्माला येण्यापुर्वीच माझ्या बापाला मला का जगात येवू द्यायचं नव्हत माझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे. तसे पहिले तर माझा बाप काही साधासुधा नव्हता. कुशल नेतृत्व, उत्तम संवादकला, दिलखेचक वक्तृत्व यासोबत तंत्रज्ञानाची जोड यामुळे माझा बाप बऱ्याच भागातील शेतकरी वर्गाला माहिती होता. स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा कधी विचार न करणारा माझा बाप इतका सामाजिक कसा झाला याचाही कधीतरी विचार करावा असे वाटते. जगातल्या काही प्रमुख बोटांवर मोजणाऱ्या शहरांपैकी एका शहरात माझा जन्म झाला. दिवसरात्र या मायानगरीत प्रत्येकजण नवीन स्वप्ने घेवून दाखल होत होते. लहान-थोर, अबालवृद्ध, स्त्री-पुरुष, चाकरमाने, व्यापारी, व्यावसायिक, कलाकार यांनी गजबजलेल्या या शहरात कोणीही कमनशिबी रहात नव्हते मग मी तर येथेच जन्माला आलीय. घरातुन बाहेर पडले कि झगमगाटात चालणारी दिवसरात्र वाहनांची वर्दळ कधी कधी वैताग ...