Posts

Showing posts from April, 2018

एकच प्याला

Image
* प्रिय हबी * उद्या तुझा अकाली मृत्यू झाला तर आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे, मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायकोबरोबर गप्पागोष्टी, थट्टामस्करी करण्याच्या सुखाला तू कायमचा मुकणार. इतक्याने तुझ्या मृत्युचे परिणाम संपणार नाहीत तर तुझ्यामुळे या आनंदाला तुझी मुलं देखील पोरकी होणार. मी तुझी बायको, मुकणार या सुखाला अन् पती सुखालाही...  किती क्षणिक सुखाचं कारण पाहिलेस? तू खोट्या आनंदात रममाण झालास. त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतोस याचे तुला भानच राहिले नाही. आपले लग्न झाल्यापासून पाहतेय, तू कायम मित्रांच्या गराड्यात cheers करत आहेस. आता तर मित्र नसले तरी किंवा काही कारण नसले तरी तुला घ्यावी लागतेच, पण आपल्या मागे कुटुंब सुद्धा आहे, त्याबद्दल आपली जबाबदारी सुद्धा आहे. याचा तुला विसर पडला आहे. शिवाय रोज रात्री बाटलीभर घेऊन घरी येणे, दंगा करणे त्यामुळे आपल्या मुलांवर काय परिणाम होतो याची तू चिंताच करत नाहीस. आपल्याला बाबा नाहीत याची त्यांना जणू सवय लागली आहे, पण तुझी भीतीही वाटत आहे. बायकोवर हात उगारणे, भांडणे हे त्यांच्यासाठी नित्याचेच झाले आहे. आपली मुलं मोठ...