व्यवसाय, भांडवल आणि तरुणाई - महेश बोरगे
फरशी, फर्निचर, गाडी, मिठाई.... जवळपास सर्वच ठिकाणी स्थानिक तरुण वर्ग दिसत नाही. जो दिसतो तो परप्रांतीय... अशीच अवस्था प्रत्येक प्रांतात दिसते. उत्तर भारत असो वा दक्षिण भारत असो..., पूर्वोत्तर असो वा पश्चिम भारतीय... सर्वच ठिकाणी स्थानिक तरुण पिढी वाया जाताना दिसत आहे. देशातील अग्रेसर राज्य आणि त्याची राजधानी मुंबईचे चित्र पाहिल्यास समजून घेणे सोपे जाईल. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काम चालूच असते. कधी कधी तरी दिवस- रात्र काम सुरू असते. एक छोट्या कारखान्याप्रमाणे नियोजनबद्ध काम सुरू असते. मुकादम, कुशल आणि अकुशल अश्यारितीने विभागणी केलेली दिसून येते. हे फक्त त्याच तरुणांच्या ग्रुपमध्ये दिसते जे तरुण बाहेरील आहेत. बांधकाम क्षेत्रात सगळे सूतार हे उत्तर भारतीय/ राजस्थानी आहेत. शिवाय सर्वजण उत्तम फर्निचर बनवतात. वाहतूक क्षेत्रात ड्रायव्हर, क्लिनर, मेकॅनिक, टायर दुरुस्ती सर्वच उत्तम काम करतात. जवळपास सर्वच क्षेत्रात हीच अवस्था आहे. या सगळ्यांचा जो म्होरक्या असतो तो तरूण तिशीतला मुलगा असतो. सुरुवातीला अगदी हमालाचे काम सुरू करून ऑपरेशनमधील सर्व माहिती स्वतः शिकलेला ...