Posts

Showing posts from October, 2018

जागतिक ग्रामीण महिला दिवस

Image
उद्या (१५/१०/२०१८) *जागतिक ग्रामीण महिला दिवस* आहे. यादिवशी ज्या गावांमध्ये यापुर्वी प्रशिक्षण झाले आहे किंवा चालु आहे किंवा नव्याने गावाची सुरुवात करावयाची आहे अश्या ठिकाणी छोटा जनजागृती कार्यक्रम राबवला जावा. देशाच्या स्तरावर दिल्लीमध्ये आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात प्रोत्साहनात्मक कार्यक्रम राबविले जात आहेत. यामध्ये देशातील अभ्यासक, संशोधक, शेतकरी, उद्योजक अश्या गटातील १०० महिलांना निमंत्रण दिले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती, पशुपालन, दुग्धव्यवसाय, मासेमारी आणि इतर शेती संलग्न उद्योगातील महिला शेतकऱ्यांचे प्रश्न, आर्थिक सहाय्य, व्यवसायातील अडचणी आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर परिसंवाद घडवून आणला जात आहे.  This image is for indication purpose only. महाराष्ट्राच्या सन २०१७-१८ च्या अहवालात शेतीचे GDP मध्ये १२.२% योगदान आहे मात्र ५०% पेक्षा जास्त लोक शेती व आधारित उपजीविका व्यवसायावर आधारित करतात. *इथे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो कि, या ५०% मध्ये लोकांमध्ये ७०% महिला आहेत. दलित, आदिवासी, पारधी, भटके अश्या समाजाच्या महिलांचा समावेश आहे. देशाच्या इतिहासात सन १९९५ ते...