Posts

Showing posts from May, 2019

वांझ .... लेखिका सुहासिनी

लग्नाला चाळीस वर्षे झाली होती. पण आज तिने त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच अश्रु पाहिले होते. तो हळव्या स्वरात तिला सांगु लागला, "आयुष्यभर कष्ट करुन, घाम गाळून, जे घर उभे केले, ज्या घराचा प्रत्येक कोपरा ह्या हातांनी सजवला, ते घर सोडून येतांना काही नाही वाटले, त्या घराचा उंबरठा नेहमीसाठी सोडून येतांनाही काहीच नाही वाटले गं..! पण... पण... वृद्धाश्रमाची पहिलीच पायरी चढताना * वांझ * असल्यासारखे वाटले..." ती त्याच्याकडे खिन्न नजरेने बघतच राहिली. पापणी न हालवता. त्याने स्वतःला सावरले आणि पुढे म्हणाला... "सुनिता, मी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे ना गं?" तिने बस् होकारार्थी मान हालवली... (मनात उदासीनता होती थोडी त्याच्या आणि थोडी तिच्याही) त्याने पुन्हा विचारले, "तुझा माझ्यावर विश्वास आहे ना गं?" हे वय राहिले नव्हते कष्ट करण्याचे पण, त्याला पुन्हा शुन्यातुन विश्व निर्माण करायचे होते. स्वाभिमान दूखावला गेला होता त्याचा. त्याच्या खांद्यावर डोके हलकेच टेकत, त्याला सावरत, "हो" म्हणाली ती. उद्याचा दिवस वेगळा असेल... * वांझ *. घरात वाद सुर