भ्रांत न पडे मजला....
*मी... माझा बाप... आणि माझी आई... !!!* @doctorforbeggars हि मला भेटली होती साधारण तीन वर्षांपुर्वी ... ! वय साधारण 35, सोबत 5-6 वर्षांचा मुलगा...! एका धार्मिक स्थळाबाहेर मागुन खायची. औषधं देता देता ... चांगली ओळख झाली. मला ती दादा म्हणायला लागली ! दरवेळी मला कोडं पडायचं... हा मुलगा कुणाचा ? जर तीचा असेल, तर याचे वडिल कुठं आहेत ? याला वडिल असतील, तर मग हि एकटीच कशी दिसते ? एकेदिवशी मी विचारलंच... ! .... लहानपणीच आईवडील वारले, जवळचं कुणी नाही... पुर्णतः निराधार. जगण्यासाठी भीक मागणं हे सोपं काम निवडलं. दिवसा भीक मागायची आणि रात्री कुठंतरी आडोसा शोधुन झोपायचं, हा रोजचा दिनक्रम ! रानटी जनावरं फक्त जंगलातच नाही, तर समाजातही अनेक ठिकाणी सापडतात. मला तर वाटतं नरभक्षक जनावरं जंगलात आणि मादीभक्षक जनावरं समाजात राहतात ! अशाच एका मादीभक्षक जनावराच्या तावडीत ती एका रात्री सापडली... आरडाओरडा केला... पण तो ऐकायला कुणालाच वेळ नव्हता... ! प्रत्येकाला कुठंतरी पोचायचं होतं... ! या झटापटीत एक मुल हिच्या पदरात प...