Posts

Showing posts from December, 2023

बाबर सागरच्या दिशेने... (मध्यप्रदेश)

मी आणि दत्ता (कोल्हापूर) त्याच्या बायकोसोबत तासगांव मध्ये पोहचलो. हा दत्ता म्हणजे पुर्वी जेंव्हा मी कृषि विभागाच्या सेवेत काम करायचो तेंव्हाचा खास दोस्त... काही प्रासंगिक कार्यक्रमामुळे आम्ही तासगांव मध्ये थांबलो होतो. ऐतिहासिक काळापासून चालत आलेल्या परंपरेप्रमाणे आणि प्रत्येक घरातील वादांप्रमाने आमच्या सावळजच्या बोर्गे घराण्यात पण नेहमीप्रमाणे घरगुती वाद सुरू झाले होते, काहींना संपत्ती पाहिजे होती, तर काहींना मान. काहींना तर माहितच नव्हते की त्यांना पाहिजे काय. यामध्ये किंवा अश्या गोष्टींमध्ये आमच्या छोट्या आई आणि मोठ्या आई यांचा सहभाग असतोच असतो. ही आमच्या बोरगे घराण्याची परंपरा म्हणाला तरी चालेल.  आपला सहभाग असावा किंवा किमान गृहीत धरले जावे म्हणून मी एका काटीच्या सहाय्याने काही मोजणीची मापे टाकत होतो त्यावर मोठी आई मला विनाकारणच हिणवत होती. वास्तविक प्रधान पुरुषाच्या मृत्यूनंतर यथोचित संस्कार करून सत्ता हस्तांतरित होणे अपेक्षित होते. मी पण गेली दीड दोन तपे होईतोपर्यंत वाट पहात पहात साम्राज्याचे यथोचित संरक्षण करत होतो. हे करण्यासाठी मी आकाशपाताळ एक केले होते. एकाच वेळी तीन तीन ...