Posts

Showing posts from January, 2024

उदगिरीचा वाघ.... India on Wheel (Travel Stories 1)

 रात्री ९.३० ते १० च्या आसपास किर्र झाडीतून वाट काढत मी चांदोलीच्या जंगलातुन मंदिराकडे चाललो होतो. जंगलातली झाडी इतकी गर्द आणि दाट होती की दाट हिरव्या गवतातून काळा कुट्ट साप सळसळत निघाला आहे असा डाबरी रस्ता होता. मधुनच घुबडाची आरोळी, रातकिडयांच्या किरकिरीला तडका देत होती. पहाटे पहाटे ३ वाजता पुजाऱ्याने अभिषेकासाठी आलेल्या भाविकाला आवाज द्यायला सुरुवात केली तेंव्हा कळले की हे लोक सर्व तयारी करून दैनंदिन देव पुजा आटोपून भाविकांच्या श्रद्धेप्रमाणे त्यांच्या त्यांच्या पुजा अर्चा करत आहेत.  ६ वाजेपर्यंत माझे प्रातःविधी आटोपुन देवींची आरती ऐकत ऐकत चहापान केले आणि इकडे तिकडे फिरत होतो. ८ वाजेपर्यंत सर्व फिरून फिरून पुन्हा गाडीत बसलो आणि पलंबरची वाट बघत कधी डुलकी लागली कळलेच नाही.  साधारण ९ वाजता गाडीला कोणतेतरी जनावर घासत आहे असे वाटले. गाडी बऱ्यापैकी म्हणजे जानवण्याइतकी अजून व्यवस्थित सांगायचे झाले तर PK मधील डान्सिंग कार प्रमाणे हलत होती. सुरुवातीला झोपेत असल्यामुळे दुर्लक्ष केले मात्र बराच वेळ परिस्थिती मध्ये बदल झाला नाही म्हणून उटून पाहायचा प्रयत्न केला पण.....  माझी झोपेच्या स्थितीत असण