कोलाहल - महेश बोरगे
दडपण, मानसिक तणाव आणि खुप काही .... चेहऱ्यावरील उसने हसू मग दुनियेतल्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसते. जगातील सर्व दुःखाचे मूळ ही अपेक्षा आहे. जेंव्हा जेंव्हा अपेक्षाचा भंग होतो मानवी मनाचा कोलाहल वाढायला सुरुवात होते. कसे बाहेर पडायचे????? ---- महेश बोरगे. कोणी विचारणारे नसावे... कोणी ओळखणारे नसावे.... फक्त मी आणि मीच.... आयुष्याच्या गडबडीत मी स्वतःलाच विसरलो आहे. कोपऱ्यावरील पांडूच्या टपरीवर कट्ट्यावर बसुन चहा पिण्यासाठी देखील विचार करावा लागतो, कोणी पाहिलं तर.... निसर्गाने सर्व गोष्टी व्यवस्थित दिल्या आणि आपण मात्र अधिक सुख-सुविधा मिळवायच्या नादात दिवसेंदिवस अधिकाधिक दुखी आणि व्यस्त होतोय. दुधाचे बिल, लाईटचे बिल, पेपरवाला, प्लंबर, खुप सारे..... सकाळी उठल्यापासुन लगबग सुरु. मग अश्या वेळी काय होईल. एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस.... वर्षनुवर्षे तुम्ही मी सगळे घाण्याच्या बैलासारखे फिरत आहोत आणि पुढेही असेच राहील. यात लगेच काही बदल होईल असे वाटत नाही. खुप खुप करून झाले आणि अश्या गोष्टींची उबग आली तर...........??????? आयुष्य कसे असावे, कोकणातल्या वाहत्या आणि खळाळत...