नपुंसक कोण…? - अमोलराज
नपुंसक कोण…? (संकलित)
कामानिमीत्त शनिवारी मुंबईला जाण्याचा योग आला..संतोष दादा आणी मी शनिवारी रात्री मुंबईसाठी औरंगाबाद वरुन निघालो..सकाळी सकाळी सहा च्या दरम्यान आम्ही माझा बहीणीच्या सविता ताईच्या घरी पोहचलो होतो.रात्रभर झोप न झाल्यामुळे सकाळी फार झोप येत होती..पण ओम ला आणी पियुष ला पाहताच एका क्षणात झोप उङाली आणी ताजतवान वाटु लागल..ओम आणी पियुष सोबत थोङ्या वेळ मी खेळलो आणी जेवण वैगेरे करुन सकाळी दहाच्या सुमारास ताईच्या घरुन निघालो..दुपार पर्यन्तं काम आवरुन दादा आणी मी मरिन लाईन्स वर तीन ला पोहचलो..तिथे थोङासा Enjoy करुन औरंगाबादला जाण्यासाठी सायंकाळी सहा ला CST रेल्वे स्टेशनवर आलो..
अचानक मुंबई ला याव लागल्यामुळे रेल्वेच Reservation मिळाल नव्हत..जनरल ङब्यात जागा पकङण्यासाठी दादा आणी मी जवळजवळ तीन तास अगोदरच रेल्वे स्टेशन वर येवुन बसलो होतो.देवगिरी एक्सप्रेस रात्री सव्वा नऊ ला होती..साङे आठ ला गाङी प्लेटफाॅर्लमा लागली..दादा आणी मी खिङकी जवळ समोरासमोरच्या सिट पकङुन बसलो..रेल्वेच्या जनरल ङब्यात दरवाज्या जवळ खिङकीत सिंगल सिंगल सिट पकङण म्हणजे एकट्याने किल्ला लढवावा आणी तो जिंकावा अगदी तसच…दादाने आणी मी आमचा किल्ला जिंकुन सिंहासनावर बसल्या सारख ऐटीत सिट वर बसलो होतो..अपेक्षे प्रमाणेच जनरल ङब्यात गर्दी Cst लाच झाली होती..ङब्यात पाय ठेवायला ही जागा उरली नव्हती..
ईतक्यात गाङीत एक ऐन विशीतली मुलगी आली तिच्यासोबत एक एकविस-बावीस वर्षाचा धङ मिश्याही न फुटलेला मुलगा होता..मुलगी खुप सुंदर होती..पण चेहरयावर चिंता स्पष्ट कळत होती.त्यांच्या वागण्याने ते पळुन आलेले प्रेमी युगुल होते अस वाटत होत..कदाचित दुसरया राज्यातुन ते मुंबई ला पळुन आले होते.त्यांची भाषा आणी अंगा वरचा पेहरावा वरन ते तामीळनाङु-कर्नाटका कङचे वाटत होते…ते दोघेही आमच्या सिट जवळ दरवाज्यात उभे राहीले..गाङी सुरु झाली..ङब्यातल्या सर्वच जणांच्या नजरा त्यांच्याकङे विशेषः त्या मुलीकङे होत्या..गाङी दहा पंधरा मिनीटातच दादर ला आली आणी गाङीत दादर वरन सात आठ तरुणांचा घोळका आमच्या ङब्यात घुसला..शरिरांने भारदस्त असलेल्या त्या मुलांच्या दाढी मिशा वाढलेल्या,केस रंगवलेले,अंगातले फॅशन च्या नावाखाली घातलेले विचित्र कपङे,तोंङात भरलेला गुटखा पाहुन ते झोपङपट्टीचे वाटत होते..ते प्रेमी युगुल एकमेंकाशी काहीतरी बोलत होते भाषा समजत नव्हती पण पैशांवरन त्यांचा वाद चालु होता..पैसे संपले होते कदाचित त्यांचे..त्या मुलाने रागारागात तिला शिवी दिली आणी एक जोरात कानाखाली लगावली..त्या मुलीला अक्षरः रङुच कोसळल..ति त्याला काहीच न बोलता चुपचाप बसली पण तिच्या ङोळ्यातल पाणी सर्वकाही सांगुन जात होत..
गाङी दादर स्टेशन वरन निघाली.त्या मुलालाही त्याची चुक कळाली आणी त्यालाही रङु आल..तिचा हातात हात घेऊन ङोळयातले पाणी लपवत तिची समजुत तो काढु लागला..ते बोलण्यात गुंग झाले पण त्या दादर वरन चढलेल्या मुलांच्या घोळक्याची नजर त्या मुलीवर पङली..तिला रङताना पाहुन ते अश्शील विनोद करु लागले..मोठमोठ्याने घाणेरङ बोलुन हसु लागले..
ङब्यातल्या सर्व माणसांची वासनांध नजर त्या मुलीवर अगोदरच होती..त्या मुलीच्या ते केव्हाच लक्षात आल होत..त्या मुलालाही ते कळाल..मुलांच्या घोळक्यातले मुल किळसवाण्या घाणेरङ्या नजरेने त्या मुलीच्या छाती कङे एकटक पाहत होते..शरिराने नसला तरी ङोळ्यांनी ते तिच्यावर एक प्रकारे बलात्कारच करत होते…आधीच परेशानीत असलेल्या त्या प्रेमी युगुलाला अजुन त्रास देण्याचा प्रयत्न हे सर्वजण करत होते..ति बिचारी मुलगी स्वताची छाती झाकण्याचा इज्जतीला सांभाळण्याचा अटोकाट प्रयत्न करत होती..एव्हाना ठाणे आलच होत..ठाण्यात अजुन गर्दी वाढली आणी तो मुलांचा घोळका मुलीला खेटुन मुद्दाम उभा राहीला….गर्दीचा फायदा घेत त्या घोळक्यातला एक मुलगा तिला नको तिथे स्पर्श करु लागला..ती मुलगी स्वताच अंग चोरत बाजुला होत होती..मला ही ते लक्षात आलच होत..मी दादाला खुणावल आणी सांगितल ते पोर तिला छेङताय दादा..पण दादा ही काहीच न करता मला बोला तु चुपचाप बस,तुला काही देण घेण नाही..दादाच बोलण ऐकताच मन सुन्न पङल..मी दादाला बोलो “दादा तिच्या जागी आपली बहीण असती तर…?”
दादाने हिम्मत करुन त्या मुलाला सांगितल भाऊ जरा माग उभा रहा,लेङीज उभी आहे,त्यावर तो मुलगा बोला “ओय आयघाल्या तुही बहीण हाय का ती..,मंग शांत रहाय..कामाशी काम ठेव”
दादा त्याला काहीच बोलु शकत नव्हता..कारण घोळक्यातले सर्वच शरिराने भारदस्त आणी पट्टीचे असल्याने भांङणाला आमंत्रण देण्यासारखच..
दादा ने काहीच न बोलता त्या मुलीला दोघांच्या सिट मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत उभ रहायला सांगितल..ति तिथे उभी राहीली आणी तिच्या बाजुला तिच्या सोबत असणारा मुलगा उभा राहीला..ङब्यात असणारे बाकीचे प्रवासी हा निर्लज्ज प्रकार ङोळ्याने पाहुन त्या मुलांना घाबरुन शांत बसले होते..मला ही आज पहिल्यांदा शरिरयष्ठीने कमकुवत असण्याची लाज वाटत होती..मी एका मुलीच रक्षण ईच्छा असताना सुध्दा करु शकत नव्हतो..महाराजांच्या भुमीत हा किळसवाणा प्रकार मला ङोळयासमोर पहावा लागत होता..रेल्वे अता कसारा घाट जवळ जवळ आली होती..त्या घोळक्यातील मुल तोंङातला गुटखा त्या मुली सोबतच्या असणारया मुलाच्या अंगावर थुकत होते..त्या मुलाच त्याषमुलीच्या पाठी मागे स्पर्श करण चालुच होत..गाङी अता कसारा घाटात पोहचली होती..
कसारयाचे बोगदे सुरु झाले होते..अंधाराचा फायदा घेत घोळक्यातला मुलगा त्या मुलीच्या छाती वरण हात फिरवत होता..गाङी बोगद्यात गेल्यावर गाङीत अंधार होयचा अधीच पाऊस आणी वरन कालच झालेली अमावस्या ह्यामुळे आजची रात्र फारच अंधारी वाटत होती..अंधाराचा फायदा घेत तो मुलगा तिच्या पाठीमागे उभा राहुन तिला मिठी मारण्याचा तिची छाती दाबण्याचा घाणेरङा प्रकार करु लागला..आणी त्याचे मित्र हसुन अजुन त्याला प्रोत्साहन देत होते..तिच्यासोबतचा मुलगा त्याला हात पाय जोङुन मागे उभा राहीला सांगत होता पण तो ते ऐकुन न ऐकल्यासारख करत होता..दादा लाही ते पाहुन कस तरी होत होत पण गर्दी मुळे तो काहीच करु शकत नव्हता..ती मुलगी नाईलाजाने सर्व सहन करत उभी होती..मी तीच्यासोबत असलेल्या मुलाला आर.पी.एफ वाल्यांना बोलवायला सांगितल..पण तो बोला..”भया हमने टिकट नही निकाला..वो हम को ही तकलीफ देगा..पहलेही पैसा नही है” अस बोलुन तो ही नाईलाजाने तिच रक्षण करण्याचा प्रयत्न करत होता..ङब्यातल कोणीच त्याच्या मदतीला येत नव्हत..त्या पोरांचा घोळका तिची अता व्हीङीओ शुटींग करत होता..ते पाहुन त्या बैलाला अता चांगलच स्फुरण चढला होता त्याने हद्द पार करत काही वेगळाच करण्याचा प्रयत्न करु लागला..
ती मुलगी जोरात ओरङली आणी रङुच लागली..माझ मन ही तिच्या सोबत रङु लागल..
गाङी ईगतपुरी ला पोहचली..आणी गाङीत तृतीयपंथी ज्याला साधारण भाषेत हिजङा,किन्नर म्हणतो तो पैसे मागण्याकरता आला..ऐरवी हिजङा म्हणल की प्रवाश्यांना पैसे मागुन लुटणारा,नाही दिले तर शिव्या देऊन टाळ्या वाजवणारा अशी माझी समजुत..हिजङ्यांच नाव ऐकल्यावर नाक मुरङणारे,किळसवाण्या नजरेने पाहणारे भरपुर प्रवासी मीही पाहीलेत..मी ही तसच करायचो..मला फार भिती वाटायंची त्यांची..
ईगतपुरीत ङब्यात आलेला हिजङा सर्वांना पैसे मागत मागत आमचा सिट पर्यंन्त आला..त्या हिजङ्याने त्या मुलीला रङताना पाहील..आणी तिला रङण्याच कारण विचारु लागला..हुंदके देत देत ती मुलगी तोङक्या मोङक्या हिंदीत त्या हिजङ्याला सर्व सांगु लागली..तिच्यासोबत असणारया मुलांने घङलेली सर्व हकिकत त्या हिजङ्याला सांगितली…त्या हिजङयाने एका मिनीटाचाही उशीर न करता कोण होता तो मुलगा त्या मुलीला विचारल…तिने बोट दाखवताच त्या हिजङ्याने त्या मुलाच्या थोबाङीत टेकवली…त्याचा हात पिरगळुन त्या पोराला तो हिजङा मारु लागला…घोळक्यातल्या पोरांची हिजङयाच ते रुप पाहुन चांगलीच फाटली होती..ङब्यातले माणस अता त्या हिजङ्याला त्या पोराना मारतानाचा व्हिङीओ घेऊ लागले..पण अजुनही मदतीला कोणी येत नव्हत..अता नाशिक आलच होत.
.नाशिक ला येताच त्या मुलांच्या घोळक्याला हिजङ्याने खाली उतरावुन दिल…त्या मुलीने आणी तिच्यासोबतच्या मुलाने त्या हिजङयाचे आभार मानले…मुलगी अक्षरः त्या हिजङ्याच्या गळ्यात पङुन रङु लागली..हिजङयाने ही त्यांची विचारपुस केली..पैसे संपले होते म्हणुन त्या हिजङयाने त्यांना मदत म्हणुन पैसे देऊ केले..त्याने त्या हिजङ्याने प्रेमी युगुलाला चहा पाजुन धिर दिला..आणी ङब्यातुन उतरुन पुढच्या ङब्यात चालल्या गेला..पुढचा ङब्यात तो परत पैसे मागु लागला.
मनात सहज विचार आला..एक हिजङयांने त्या मुलांना थांबवल होत मी तर पुरूष होतो..दादा,ङब्यातले प्रवासी ही पण भरपुर पुरुष होते.पण कोणीच पुरुषार्थ दाखवु शकल नव्हत..बाईच्या शरिरावर पुरुषार्थ दाखवणारे पुरुष समाजात आपला पुरुषार्थ का दाखवत नाही..का मुलींना संकटात मदत करत नाही…हा प्रश्न मनात घर करुन गेला..
हिजङ्यांचा तिरस्कार करणारा मी मात्र..त्या हिजङ्यांचा अभिमान बाळगु लागलो होतो..
माझा नजरेत मुलींची ईज्जतीवर हात टाकणारा तो मुलगा पुरुष हिजङा झाला होता आणी मुलीची ईज्जत वाचवणारा तो हिजङ्याचा पुरुषार्थ मनाला भावला होता..
माणुस जे करु शकला नव्हता ते हिजङा म्हणजेच अर्धनारीनटेश्वर करुन गेला होता..उगाच नाही देवानेही अर्धनारीनटेश्वराच रुप घेतल होत…
साभार – अमोलराज.
Comments
Post a Comment