“मै ऐसा ही हूँ ”...
मी फार टेक्नीकल बोलतो,
अस सारख वाटत होत तिला,
“मै ऐसा ही हूँ ” म्हणुन,
सांगू तरी कस तिला.
ती म्हणते बघ ना रे,
सुटलाय धुंद गार वारा,
मी म्हणतो हवामान खात्याने,
दिला होता कालच इशारा.
ती म्हणते हात तुझा,
किती उबदार वाटतो मला,
मी म्हणतो बहुतेक असेल,
किंचितसा ताप मला.
मी म्हणतो समुद्राच्या पाण्यात,
कैल्शियम च फेस आहे,
ती म्हणते काही सांगू नकोस,
तू मोठी सायकोलोजिकल केस आहेस .
ती रोमांस मधली नजाकत मला सांगते,
मी सुद्धा गुणसुत्रांची गुंतागुंत सांगतो,
ती कपाळावर स्वतःच्या मारून घेते ,
मी पुढच्या वाक्याची वाट पाहतो...
आता हळू हळू मला प्रेमाचे,
विज्ञान कळायला लागलय,
तिलापन माझ्या सोबत राहून,
विज्ञानावर प्रेम बसलय...
Comments
Post a Comment