आधुनिक शेती - महेश बोरगे

वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जल, जनावर, जंगल व जमीन वाढत नाही. तर ते दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. जमिनीची धूप होऊन माती समुद्राकडे चालली आहे. जास्तीच्या पाणी उपसा व त्या प्रमाणात मुरण्याचे प्रमाण कमी झाले त्यामुळे भुजल पातळी कमी झाली आहे. यासाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने शेती करावी किंवा केली जात आहे.

यामध्ये प्रामुख्याने *जल, जंगल, जनावर, जमीन यांचे संरक्षण आणि वाढ करणे यावर भर दिला जातो.* उदा. म्हणजे माथा ते पायथा जल व मृद संधारण केले जाते ह्यामुळे *उंच भागात* माती संचय होतो. धावणारे पाणी चालते आणि चालणारे पाणी थांबते. *थोड्याशा सखल भागात* शेतकऱ्यांची शेती असते याठिकाणी शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतात *उताराला आडवे बांधबंदिस्ती केली जाते. बांधावर पडलेल्या जमिनीमध्ये जंगली वृक्ष किंवा फळबाग लागवड केली जाते. शेतामध्ये उताराला आडवी पेरणी करणे. पिकांची फेर पालट करणे. पारंपरिक सिंचनाला बगल देऊन मटका, ठिबक, तुषार सिंचन पद्धती वापरणे. मल्चिंग वापरून पाण्याचे बाष्पीभवन थांबविणे. कृषी व कृषी पुरक व्यवसायांना प्राधान्य देणे.*अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती वापरून केलेल्या शेतीला आधुनिक शेती पद्धत म्हणायचे.

शेवटी ओढा, वगळी, नाले यांवर बांध घालून पाणी जिरवले जाते. वरील पद्धतीने जल, जंगल व जमीन समृद्धीला हातभार लागतो आणि नैसर्गिक साधन संपत्तीची वाढ होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते.

माझीशेती मार्फत *आधुनिक शेतीबरोबर तंत्रज्ञानाची जोड देऊन व्यावसायिक शेती करायला शिकवले जाते.* माझीशेतीच्या *प्रोफेशनल ऍग्रीकल्चर प्रशिक्षण* घेतल्यानंतर शेतीतील नवीन बदल आणि तंत्रज्ञान विकसित होऊन शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. तुम्हीसुद्धा या प्रशिक्षणाचा लाभ घ्या... *अधिक माहितीसाठी माझीशेती प्रतिनिधींशी किंवा www.mazisheti.org वर संपर्क करा.*

Comments

Popular posts from this blog

Corporates & CSR project implementation

The Imperative of ESG Reporting in Corporate Practices - Mahesh Borge, CSR COnsultant

WHAT WENT WRONG ???