हिरवळीची वाट - महेश बोरगे

(माझ्या डायरीमधील "हिरवळीची वाट" या सदरातील निवडक परिच्छेद)
- महेश बोरगे

आणि आज पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली. वृक्षांची सळसळती पाने पुन्हा एकदा वाऱ्यावर उडाली. हवेत गारवा आणि उंचपर्यंत धुळीचे काहुर माजले होते. मनातील भावना चहाच्या कपातील वादळासारख्या उसळत होत्या. दाही दिशा चालून येऊ लागल्या आहेत. सुंदर चेहरे आणि त्यांच्या पाठी दडलेल्या काळवंडलेल्या छटा पुन्हा एकदा उसळ्या मारून पुढे येऊ लागल्या आहेत. आयुष्यात पहिल्यांदाच सरसर मागील आठ ते दहा वर्षे निघून गेलेली पण कळली नाहीत. 

सुफी गायनाने मनाला प्रसन्नता मिळत असली तरी एकाच प्रकारचे संगीत समाज ऐकू देईल तर शप्पथ.... अधून मधून श्रावणाच्या सरींप्रमाणे हलक्या सुफी संगीताने प्रसन्नता मिळवून घेणे आवश्यक वाटले आणि आजही या संगीताच्या जोरावर या भयाण वादळी वाऱ्याच्या आयुष्याच्या वाटचालीत मार्गक्रमण चालू ठेवले आहे. 

काळोख्या रात्री दहा दिशांनी दरवाजे बंद केले तेंव्हा त्या एका मिणमिणत्या ज्योतीच्या प्रकाशात एक एक पाऊल टाकत कसाबसा रास्ता धुंडाळावा लागला. पण या भयाण वादळात ती इवलीशी ज्योत काय तग धरणार.... शेवटच्या क्षणी आठवणींचे धुवा मागे टाकत हळूच मान टाकली. अधून मधून वातीतुन बाहेर पडणारा धुरही आता दिसेना इतका काळाचा मारा प्रबळ झाला.

रानातील काट्यांकुट्यांच्या वाटेवरून उडणारा फफुटा कधी कधी प्रिय वाटू लागतो इतके भयाण वातावरण पसरले आणि पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या वाटेवरती हलकेसे स्मित पसरून गेले. वावंटाळाने खूप उंचच उंच उडवत न्यावे. निमिषात आसमंत गाठावे. अगदी टोकावर जावे आणि एखाद्या उंचावरील किल्ल्याच्या बुरुजाला धडकून घायाळ व्हावे. सुंदर, हलके, मनमोहक स्मित हास्य केंव्हा स्वप्नात परावर्तित व्हावे याचा अंदाज न लागावा अश्या अवस्थेत प्रगतीच्या वाटेवर रस्ताच गायब व्हावा अशी स्थिती झाली.

प्रगतीच्या वाटेवरील ते एक सुंदर स्वप्न प्रत्यक्षात मात्र साकार होणे दुरापास्त झाले. मृगजळाच्या पाठीमागे धावता धावता डोके फुटले, गुडघे फुटले, पाऊले रक्ताने माखली, महाराष्ट्र भूमीला चौफेर वंदन केले मात्र प्रगतीचा रस्ता केंव्हा आणि कसा चुकला आजही गुढंच आहे. आश्वासनांचा पाऊस आणि वचनांचा चिखल या वाटेवर केंव्हा तयार झाला कळलेच नाही. आजही या मळलेल्या प्रगतीच्या वाटेवर जायला प्रयत्नरत आहे पण या नियतीच्या घड्याळात माझा ठोका केंव्हा पडेल आजही कळले नाही.

शांत, संयमी, क्रूर, कुटणीतीने परिपुर्ण शीतल चंद्राच्या प्रखर उष्णतेने अंग अंग जाळून घेतले आहे. एकटाच धावत धावत ब्रिटिशांच्या सात बेटांच्या बंदरावर का आणि कसा पोहचलो देव जाणे. विश्वाच्या निवडक एका प्रचंड मोठ्या सागराकाठी असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी मी पहुडलो अगदी कायमचा.... सुफीचा नाद आजही कानात गुंजारव करतो आहे. 

कळत न कळत इथेच बेटाच्या बाजुला कायमचे सुफीचे गाणं कानात पडत रहावं आणि शेवटच्या घटका घ्याव्यात असे विचार करत करत राजाच्या स्नेहपुर्ण मिलनाच्या प्रतीक्षेत असताना आमच्या राजधानीच्या बाजूला NH4 वरुन जाणाऱ्या ट्रकच्या जोरात वाजणाऱ्या हॉर्नमुळे आज पुन्हा एकदा निद्रेतून खडबडून जाग आली.

- महेश बोरगे
www.mazisheti.org
www.wdtindia.org
www.fb.com/maheshborge 

Comments

  1. Ek jo mala kalale tula. Kai mhanayche ahe te

    ReplyDelete
    Replies
    1. लेखकाला फक्त दखल आवश्यक असते.. thanks

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

Corporates & CSR project implementation

The Imperative of ESG Reporting in Corporate Practices - Mahesh Borge, CSR COnsultant

बाबर सागरच्या दिशेने... (मध्यप्रदेश)