"समर्पण" - महेश बोरगे
तु खुप समजुतदार आहेस. अगदी सुरवातीपासुन तु सर्व निर्णय पुर्ण विचार करुन घेतले आहेस. नातेसंबंध असोत, मिञ असोत वा घरातील कठीन प्रसंग असोत तु ठामपणे अचल आहेस. तुला नेहमी जे योग्य वाटले ते तु केले आहेस आणि इथुन पुढे भविष्यातही करशील यात शंका नाही. प्रत्येक निर्णय घेताना ठाम रहा, समाजाचा विचार करु नको. फक्त काळजी घे की कोणाच्या मुलभुत हक्कांवर तुझ्यामुळे गदा येवु देवु नको.
आयुष्याच्या या मायाजालात तु, मी, आपन सर्वजन काहीच नाही आहोत. वेळ इतका वेगवान आहे की बालपन केंव्हा गेले , शिक्षण संपले कधी कळलेच नाही. इथुन पुढेही वेळ कधी सरुन गेला कळणार नाही.
आपले संस्कार, संस्कृती जोपासुन आयुष्यातील निर्णय घे. सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवुन भौतीक सुखास प्राधान्य न देता आयुष्याची गाडी हाकायची असते. संस्कार, समाज, शिक्षण, आयुष्याचा साथीदार, मुले यामध्ये नेहमीच गुंतवणुक कर. बारकाईने भविष्याचा विचार कर. भुतकाळात एक पाऊल, भविष्यात एक पाऊल ठेवुन वर्तमानाचा आनंद घे. भुतकाळाला कुरवाळत बसु नको, भविष्याचा जास्त विचार करुन वर्तमानातील वेळ वाया जाऊ देवु नको.
स्वत:शी संबंधीत निर्णय घेताना कोणाचाही विचार करु नको. निर्णय चुकणे वाईट नाही पण निर्णय न घेणे खुप वाईट आहे. निर्णय चुकला तर चांगला अनुभव मिळेल आणि बरोबर आला तर चांदीच आहे. फक्त आयुष्याचा साथीदार निवडताना माञ चौकस रहा. तिथे ना अनुभव ना चांदी, या ठिकाणी पालकांचा सल्ला घेवुन सहकारी मिञांचा विचार करायला हरकत नाही कारण प्रेम करुन लग्न करने आणि लग्न करुन प्रेम करने हे म्हणजे माप देवुन कपडे शिवणे आणि शिवलेली कपडे आपल्यासाठी वापरणे. त्यामुळे हा निर्णय घेणे म्हणजे तारेवरची कसरत अाहे. याबाबतीत नक्कीच आपले मिञांपैकी एखादा / एखादी मिञ-मैञीण आयुष्याचा साथीदार चांगला पर्याय ठरु शकतो. आपल्या सहवासातील सर्वच आपले मिञ बनु शकत नाहीत. ज्यांचा स्वभाव, मते, आवडी-निवडी जुळतात तेच एकमेकांचे चांगले मिञ बनतात. यापेक्षा जोडीदाराकडुन वेगळी अपेक्षा करु नको. जोडीदारावर कोणती गोष्ट लादु नको. हे नाते फुलपाखरासारखे असते. ते अलगद जपण्याचा प्रयत्न कर.
आयुष्याच्या वाटेवर चालताना नजरेसमोर नेहमी अंतिम ध्येय ठेव. मोठी ध्येय गाठताना त्याची विभागणी छोट्या भागात केली तर ध्येय गाठणे सोपे जाईल.
अडचणीच्यावेळी ध्येय बदलु नको पण सोयीस्करपणे रस्ता बदलताना कोणाचाही विचार करु नको. लक्षात ठेव "शिकारीवर झडप घालायच्या अगोदर दोन पाउले मागे जाणे म्हणजे संपुर्ण माघार नव्हे." आयुष्यात येणार्या अडचणींना सामोरे जाताना पालकांशी मिञाचे नाते ठेव. त्यांच्याशी तुझ्या स्वभाव, मते, आवडी-निवडी यांची नेहमी चर्चा करत जा. काही वेळेस पालकांना तुझ्या गोष्टी पटणार नाहीत त्यावेळी पालकांना शांतपणे पटवुन दे अन्यथा त्यांची मते तुझ्या मनाविरुद्ध तुझ्यावर लादली जावु नयेत याची काळजी घे. ही वेळ वादाची तेंव्हा ठरते जेंव्हा जोडीदाराची निवड करायची वेळ आलेली असते. लग्नानंतर दोन अनोळखी कुटुंबे एकमेकांच्या संस्कार, संस्कृती नुसार एकञ येतात तेंव्हा तुझ्या आयुष्यातील दुसरे पर्व सुरु होइल. यावेळी भौतिक सुखांचा त्याग करणे, वरिष्ठांचा मान राखणे, चेहर्यावर प्रसन्नता ठेवणे आणि शांती राखणे या गोष्टी तुला उपयोगी ठरतील. आयुष्यात केंव्हाच व्यावसाियक नातेसंबंध व कौटुंबिक नातेसंबंध यांची गल्लत करु नको. नेहमी प्रवाहा बरोबर वहात जा, विरोधात जाताना वेळ, शांती, ताकत, पैसा विनाकारन वाया जाईल. स्वत:ला जगाबरोबर अद्ययावत कर जेणेकरुन तु कोणत्याच ठिकाणी मागास वाटु नये.
आयुष्य खुप छोटे आहे, देण्यात जी मजा आहे ती घेण्यात कधीच मिळणार नाही. काळजी घे. आनंदी रहा.
आयुष्याच्या वळणावर कधी योग आला तर नक्की भेटु.
तुझा सोबती, सारथी...
महेश बोरगे.
Comments
Post a Comment