Posts

Showing posts from 2020

कोरोना व्हायरस काय करतो ? न्युमोनिया ? - डॉ. नितीन पाटणकर

Image
*१) कोरोना व्हायरस काय करतो ? न्युमोनिया ?* *नाही. या व्हायरसमुळे न्यूमोनिया होत नाही. कोरोनामुळे  फुफुसात जे काही होते, आपण त्याला न्यूमोनिया समजून उपचार करीत राहतो हे कदाचित चुकत असावे.*  *SARS2 Corona व्हायरस हिमोग्लोबिनला चिकटून बसतो.* *त्याला झटकून टाकण्याच्या प्रयत्नात लोहाचे कण (ions) सुटे होऊन रक्तात मिसळतात.* *त्या मुळे हिमोग्लोबिन पुरेसा ऑक्सिजन वाहून नेउ शकत नाही.* *शरीरातील महत्वाच्या आणि मोठ्या अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू लागतो.*  *उपचारानंतर ऑक्सिजनचा पुरवठा वाढवला तरी त्याला वाहून नेणारे हिमोग्लोबिन कोरोनाच्या विळख्यात असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा झपाट्याने वाढत जाऊन अनेक अवयव एकाच वेळी निकामी होतात. याला Resistant Hypoxia with Rapid Multi-organ Failure असे म्हटले जाते.* *रक्तातील वाढते लोहकण हे इतके मारक असतात की त्यांच्यामुळे फुफुसांना तीव्र इजा होते. या इजा होण्यामागे फुफुसातील ऑक्सिजन आणि रक्तातील लोहकण यांची रिॲक्शन जबाबदार असते. याला Powerful Oxidative Damage म्हटले जाते.* *कुठच्याही जंतुसंसर्गात, जर फुफुसांचा संसर्ग असेल तर न्यूमोनिया होतो. पण सुर...

भ्रांत न पडे मजला....

*मी... माझा बाप... आणि माझी आई... !!!* @doctorforbeggars  हि मला भेटली होती साधारण तीन वर्षांपुर्वी ... !  वय साधारण 35,  सोबत 5-6 वर्षांचा मुलगा...!  एका धार्मिक स्थळाबाहेर मागुन खायची.  औषधं देता देता ... चांगली ओळख झाली. मला ती दादा म्हणायला लागली !  दरवेळी मला कोडं पडायचं... हा मुलगा कुणाचा ?  जर तीचा असेल, तर याचे वडिल कुठं  आहेत ?  याला वडिल असतील, तर मग हि एकटीच कशी दिसते ?  एकेदिवशी मी विचारलंच... !  .... लहानपणीच आईवडील वारले, जवळचं कुणी नाही... पुर्णतः निराधार.  जगण्यासाठी भीक मागणं हे सोपं काम  निवडलं. दिवसा भीक मागायची आणि रात्री कुठंतरी आडोसा शोधुन झोपायचं, हा रोजचा दिनक्रम ! रानटी जनावरं फक्त जंगलातच नाही, तर समाजातही अनेक ठिकाणी सापडतात.  मला तर वाटतं नरभक्षक जनावरं जंगलात आणि मादीभक्षक जनावरं समाजात राहतात !  अशाच एका मादीभक्षक जनावराच्या तावडीत ती एका रात्री सापडली... आरडाओरडा केला... पण तो ऐकायला कुणालाच वेळ नव्हता... ! प्रत्येकाला कुठंतरी पोचायचं होतं... !  या झटापटीत एक मुल हिच्या पदरात प...