"स्वत्वपरीक्षा - महेश बोरगे
स्त्री नेहमी जग जिंकायची ताकत बाळगते पण ज्यांच्यासाठी कष्ट करायचे, राबायचे, हाडाची काडे करायची त्यांना याची तसुभर चिंता नसते. जेंव्हा समाज बघ्याची भूमिका घेतो आणि "समाज काय म्हणेल" या तीन शब्दावर आयुष्य फिरायला सुरुवात होते तेंव्हा संघर्षशक्ती पणाला लागते. त्यातूनही स्त्री अशी ताकत आहे कि ती जगाला दिशा देऊ शकते पण स्वाभाविक प्रेमळ, हळवी असणारी स्त्री फक्त हृदयातुन विचार करते त्यामुळे परिस्थिती चिघळत जाते. मेंदूने विचार केली तरच अश्या परिस्थितीतून बाहेर पडू शकते. या परिस्थितीत स्त्रियांनी खचून न जाता परिस्थितीशी दोन हात करायला सज्ज व्हायला पाहिजे. सज्ज होणे म्हणजे युद्ध पुकारणे असे नाही. अगदी लहानपणापासुन शब्दांचा मारा करून करून मुलींची उमेद कमी करायचे काम पालक करीत असतात. कितीही कर्तुत्व सिद्ध केले... चांगली नोकरी अथवा उद्योग जरी उभा केला तरी मुलगी वस्तू असल्यासारखी दाखवली जाते. पालकांच्या भाबड्या आश्या, लहानपणापासुन केलेला शब्दांचा मारा यातुन आजच्या जमान्यातील मुलींच्या मनातही मी स्वतंत्र आहे, मी सर्वकाही करू शकते या विचारासोबत माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी असे केले ...