आधुनिक शेती - महेश बोरगे
वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जल, जनावर, जंगल व जमीन वाढत नाही. तर ते दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. जमिनीची धूप होऊन माती समुद्राकडे चालली आहे. जास्तीच्या पाणी उपसा व त्या प्रमाणात मुरण्याचे प्रमाण कमी झाले त्यामुळे भुजल पातळी कमी झाली आहे. यासाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने शेती करावी किंवा केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने *जल, जंगल, जनावर, जमीन यांचे संरक्षण आणि वाढ करणे यावर भर दिला जातो.* उदा. म्हणजे माथा ते पायथा जल व मृद संधारण केले जाते ह्यामुळे *उंच भागात* माती संचय होतो. धावणारे पाणी चालते आणि चालणारे पाणी थांबते. *थोड्याशा सखल भागात* शेतकऱ्यांची शेती असते याठिकाणी शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतात *उताराला आडवे बांधबंदिस्ती केली जाते. बांधावर पडलेल्या जमिनीमध्ये जंगली वृक्ष किंवा फळबाग लागवड केली जाते. शेतामध्ये उताराला आडवी पेरणी करणे. पिकांची फेर पालट करणे. पारंपरिक सिंचनाला बगल देऊन मटका, ठिबक, तुषार सिंचन पद्धती वापरणे. मल्चिंग वापरून पाण्याचे बाष्पीभवन थांबविणे. कृषी व कृषी पुरक व्यवसायांना प्राधान्य देणे.*अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती वापरून ...