Posts

Showing posts from 2018

जागतिक ग्रामीण महिला दिवस

Image
उद्या (१५/१०/२०१८) *जागतिक ग्रामीण महिला दिवस* आहे. यादिवशी ज्या गावांमध्ये यापुर्वी प्रशिक्षण झाले आहे किंवा चालु आहे किंवा नव्याने गावाची सुरुवात करावयाची आहे अश्या ठिकाणी छोटा जनजागृती कार्यक्रम राबवला जावा. देशाच्या स्तरावर दिल्लीमध्ये आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात प्रोत्साहनात्मक कार्यक्रम राबविले जात आहेत. यामध्ये देशातील अभ्यासक, संशोधक, शेतकरी, उद्योजक अश्या गटातील १०० महिलांना निमंत्रण दिले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती, पशुपालन, दुग्धव्यवसाय, मासेमारी आणि इतर शेती संलग्न उद्योगातील महिला शेतकऱ्यांचे प्रश्न, आर्थिक सहाय्य, व्यवसायातील अडचणी आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर परिसंवाद घडवून आणला जात आहे.  This image is for indication purpose only. महाराष्ट्राच्या सन २०१७-१८ च्या अहवालात शेतीचे GDP मध्ये १२.२% योगदान आहे मात्र ५०% पेक्षा जास्त लोक शेती व आधारित उपजीविका व्यवसायावर आधारित करतात. *इथे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो कि, या ५०% मध्ये लोकांमध्ये ७०% महिला आहेत. दलित, आदिवासी, पारधी, भटके अश्या समाजाच्या महिलांचा समावेश आहे. देशाच्या इतिहासात सन १९९५ ते...

व्यवसाय, भांडवल आणि तरुणाई - महेश बोरगे

Image
फरशी, फर्निचर, गाडी, मिठाई.... जवळपास सर्वच ठिकाणी स्थानिक तरुण वर्ग दिसत नाही. जो दिसतो तो परप्रांतीय... अशीच अवस्था प्रत्येक प्रांतात दिसते. उत्तर भारत असो वा दक्षिण भारत असो..., पूर्वोत्तर असो वा पश्चिम भारतीय... सर्वच ठिकाणी स्थानिक तरुण पिढी वाया जाताना दिसत आहे. देशातील अग्रेसर राज्य आणि त्याची राजधानी मुंबईचे चित्र पाहिल्यास समजून घेणे सोपे जाईल. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काम चालूच असते. कधी कधी तरी दिवस- रात्र काम सुरू असते. एक छोट्या कारखान्याप्रमाणे नियोजनबद्ध काम सुरू असते. मुकादम, कुशल आणि अकुशल अश्यारितीने विभागणी केलेली दिसून येते. हे फक्त त्याच तरुणांच्या ग्रुपमध्ये दिसते जे तरुण बाहेरील आहेत.  बांधकाम क्षेत्रात सगळे सूतार हे उत्तर भारतीय/ राजस्थानी आहेत. शिवाय सर्वजण उत्तम फर्निचर बनवतात. वाहतूक क्षेत्रात ड्रायव्हर, क्लिनर, मेकॅनिक, टायर दुरुस्ती सर्वच उत्तम काम करतात. जवळपास सर्वच क्षेत्रात हीच अवस्था आहे.  या सगळ्यांचा जो म्होरक्या असतो तो तरूण तिशीतला मुलगा असतो. सुरुवातीला अगदी हमालाचे काम सुरू करून ऑपरेशनमधील सर्व माहिती स्वतः शिकलेला ...

Market Linkage after skill development - Mahesh Borge

Image
The trainees of any training are already engaged in production activity. Main market for the any of the produce is the nearest urban society. Actually market linkage opportunities may be considered in two categories i.e. established business group or need based newly created business. Established business group have bulk orders but profit ratio is less as compared to need based newly created business. Approximately 20% more profit will be available in need based newly created business.  Every individual can easily deal with machine or non reacting objects for example anyone can grow mango but anyone couldn't sale mango. Here when you are growing mango you have to deal with soil, water, inputs and finally mango tree these objects are non reacting but when you reach in market for selling mango's you have to deal with human being which is most reacting object.  Every single person is very active in his known community is the main logic of Market Linkage planning a...

Business without investment??

Image
we were always think about starting our own business and off course, every business house is small then step by step convert in bigger. All of we heard success stories of business giants like TATA, BATA, BIRLA, AMBANI and much more name list ahead. Initially they are very small but hard work, decision making capacity, opportunity make them business giants.  Recently many companies started and spread worldwide with technology solutions. Hence the term used previously that "plant a mango tree then your offspring will eat sweat n delicious mangoes" but now a days well known business houses flipcart, amazon, snapdeal, uber, ola, big basket, facebook and much of start up started there business activity on tech piller get success within short time.  I'm not saying that you can start your business without investment and you'll achieve success as compare to such business giants. But definitely you may start your business without investment. Every activity will be ba...

भावना - अव्यक्त भावनांची कहाणी - भाग ०२

लवकरच वाचकांना सादर केले जाईल. भावना - अव्यक्त भावनांची कहाणी - भाग ०१

तेजोवलय (Aura) - वैशाली देशपांडे

Image
ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे, त्याविषयी थोडेसे... मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते. Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते... आणि त्या खालोखाल मेंदू. यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्...

एकच प्याला

Image
* प्रिय हबी * उद्या तुझा अकाली मृत्यू झाला तर आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे, मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायकोबरोबर गप्पागोष्टी, थट्टामस्करी करण्याच्या सुखाला तू कायमचा मुकणार. इतक्याने तुझ्या मृत्युचे परिणाम संपणार नाहीत तर तुझ्यामुळे या आनंदाला तुझी मुलं देखील पोरकी होणार. मी तुझी बायको, मुकणार या सुखाला अन् पती सुखालाही...  किती क्षणिक सुखाचं कारण पाहिलेस? तू खोट्या आनंदात रममाण झालास. त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतोस याचे तुला भानच राहिले नाही. आपले लग्न झाल्यापासून पाहतेय, तू कायम मित्रांच्या गराड्यात cheers करत आहेस. आता तर मित्र नसले तरी किंवा काही कारण नसले तरी तुला घ्यावी लागतेच, पण आपल्या मागे कुटुंब सुद्धा आहे, त्याबद्दल आपली जबाबदारी सुद्धा आहे. याचा तुला विसर पडला आहे. शिवाय रोज रात्री बाटलीभर घेऊन घरी येणे, दंगा करणे त्यामुळे आपल्या मुलांवर काय परिणाम होतो याची तू चिंताच करत नाहीस. आपल्याला बाबा नाहीत याची त्यांना जणू सवय लागली आहे, पण तुझी भीतीही वाटत आहे. बायकोवर हात उगारणे, भांडणे हे त्यांच्यासाठी नित्याचेच झाले आहे. आपली मुलं मोठ...

क्रांती - महेश बोरगे

काल, आज आणि उद्या             ‘मी स्त्री आहे हे वास्तव जगाने स्वीकारायला हवे. साहजिकच एक स्त्री म्हणुन मी सुंदर असणे स्वाभाविक आहे परंतु सुंदर असण्यापेक्षा मला पुरुषांना आकर्षित करण्यासाठी मला अधिक गरम किंवा मादक असायलाच हवे आणि हा मला लोकशाहीने दिलेल्या मुलभूत हक्कापैकी एक हक्क आहे.’ हो, काय चुकीच आहे, एकेकाळी सांगलीच्या (नागठाणेच्या) बाळगंधर्वांनी स्वतः स्त्रीचा अभिनय करून स्त्रीला माणसात आणले. आणखी थोडस पाठीमागे गेलो आणि काळाचा पडदा किलकिला करून पाहिलं तर सदासर्वदा इतकंच जाणलं की स्त्रीला परमपुज्य रामांनी देखील एक मर्यादेतच ठेवले होते. कारण काहीही असो पण स्त्री आणि मर्यादा हे एक समीकरणच होते. परंतु एकदमच पाठीमागे भुतकाळात ज्यावेळी समाज किंवा कोणतीही रुढी – परंपरा नव्हती तेंव्हा कोणालाही कसल्याही मर्यादा नव्हत्या हेही ध्यानांत घ्यायला हवं.                 ज्यावेळी समाज वेगवेगळ्याप्रकारे वेगवेगळ्या थरात स्वतःला आकार देत गेला त्यावेळी प्रत्येक घरातील आजी, आई, बायको, बहिण, मुलगी या वेगवेगळ्या रुपात स्त्री ही ...