Posts

भावना - अव्यक्त भावनांची कहाणी - भाग ०२

लवकरच वाचकांना सादर केले जाईल. भावना - अव्यक्त भावनांची कहाणी - भाग ०१

तेजोवलय (Aura) - वैशाली देशपांडे

Image
ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे, त्याविषयी थोडेसे... मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते. Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते... आणि त्या खालोखाल मेंदू. यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्...

एकच प्याला

Image
* प्रिय हबी * उद्या तुझा अकाली मृत्यू झाला तर आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे, मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायकोबरोबर गप्पागोष्टी, थट्टामस्करी करण्याच्या सुखाला तू कायमचा मुकणार. इतक्याने तुझ्या मृत्युचे परिणाम संपणार नाहीत तर तुझ्यामुळे या आनंदाला तुझी मुलं देखील पोरकी होणार. मी तुझी बायको, मुकणार या सुखाला अन् पती सुखालाही...  किती क्षणिक सुखाचं कारण पाहिलेस? तू खोट्या आनंदात रममाण झालास. त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतोस याचे तुला भानच राहिले नाही. आपले लग्न झाल्यापासून पाहतेय, तू कायम मित्रांच्या गराड्यात cheers करत आहेस. आता तर मित्र नसले तरी किंवा काही कारण नसले तरी तुला घ्यावी लागतेच, पण आपल्या मागे कुटुंब सुद्धा आहे, त्याबद्दल आपली जबाबदारी सुद्धा आहे. याचा तुला विसर पडला आहे. शिवाय रोज रात्री बाटलीभर घेऊन घरी येणे, दंगा करणे त्यामुळे आपल्या मुलांवर काय परिणाम होतो याची तू चिंताच करत नाहीस. आपल्याला बाबा नाहीत याची त्यांना जणू सवय लागली आहे, पण तुझी भीतीही वाटत आहे. बायकोवर हात उगारणे, भांडणे हे त्यांच्यासाठी नित्याचेच झाले आहे. आपली मुलं मोठ...

क्रांती - महेश बोरगे

काल, आज आणि उद्या             ‘मी स्त्री आहे हे वास्तव जगाने स्वीकारायला हवे. साहजिकच एक स्त्री म्हणुन मी सुंदर असणे स्वाभाविक आहे परंतु सुंदर असण्यापेक्षा मला पुरुषांना आकर्षित करण्यासाठी मला अधिक गरम किंवा मादक असायलाच हवे आणि हा मला लोकशाहीने दिलेल्या मुलभूत हक्कापैकी एक हक्क आहे.’ हो, काय चुकीच आहे, एकेकाळी सांगलीच्या (नागठाणेच्या) बाळगंधर्वांनी स्वतः स्त्रीचा अभिनय करून स्त्रीला माणसात आणले. आणखी थोडस पाठीमागे गेलो आणि काळाचा पडदा किलकिला करून पाहिलं तर सदासर्वदा इतकंच जाणलं की स्त्रीला परमपुज्य रामांनी देखील एक मर्यादेतच ठेवले होते. कारण काहीही असो पण स्त्री आणि मर्यादा हे एक समीकरणच होते. परंतु एकदमच पाठीमागे भुतकाळात ज्यावेळी समाज किंवा कोणतीही रुढी – परंपरा नव्हती तेंव्हा कोणालाही कसल्याही मर्यादा नव्हत्या हेही ध्यानांत घ्यायला हवं.                 ज्यावेळी समाज वेगवेगळ्याप्रकारे वेगवेगळ्या थरात स्वतःला आकार देत गेला त्यावेळी प्रत्येक घरातील आजी, आई, बायको, बहिण, मुलगी या वेगवेगळ्या रुपात स्त्री ही ...

भावना - अव्यक्त भावनांची कहाणी भाग - ०१

Image
ढगांनी दाटी केलेली आणि काही केल्या काळोख हटायला तयार नव्हता. वास्तविक ज्यांच्यावर आयुष्याची डोर ठेवायची त्यांचीच इच्छा नव्हती कि मी जन्माला यावं. का कोणास ठावूक पण या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कारण असतेच असते. मी जन्माला येण्यापुर्वीच माझ्या बापाला मला का जगात येवू द्यायचं नव्हत माझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे. तसे पहिले तर माझा बाप काही साधासुधा नव्हता. कुशल नेतृत्व, उत्तम संवादकला, दिलखेचक वक्तृत्व यासोबत तंत्रज्ञानाची जोड यामुळे माझा बाप बऱ्याच भागातील शेतकरी वर्गाला माहिती होता. स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा कधी विचार न करणारा माझा बाप इतका सामाजिक कसा झाला याचाही कधीतरी विचार करावा असे वाटते.  जगातल्या काही प्रमुख बोटांवर मोजणाऱ्या शहरांपैकी एका शहरात माझा जन्म झाला. दिवसरात्र या मायानगरीत प्रत्येकजण नवीन स्वप्ने घेवून दाखल होत होते. लहान-थोर, अबालवृद्ध, स्त्री-पुरुष, चाकरमाने, व्यापारी, व्यावसायिक, कलाकार यांनी गजबजलेल्या या शहरात कोणीही कमनशिबी रहात नव्हते मग मी तर येथेच जन्माला आलीय. घरातुन बाहेर पडले कि झगमगाटात चालणारी दिवसरात्र वाहनांची वर्दळ कधी कधी वैताग ...

प्रयत्नांती परमेश्वर.... - महेश बोरगे

Image

आधुनिक शेती - महेश बोरगे

Image
वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जल, जनावर, जंगल व जमीन वाढत नाही. तर ते दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. जमिनीची धूप होऊन माती समुद्राकडे चालली आहे. जास्तीच्या पाणी उपसा व त्या प्रमाणात मुरण्याचे प्रमाण कमी झाले त्यामुळे भुजल पातळी कमी झाली आहे. यासाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने शेती करावी किंवा केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने *जल, जंगल, जनावर, जमीन यांचे संरक्षण आणि वाढ करणे यावर भर दिला जातो.* उदा. म्हणजे माथा ते पायथा जल व मृद संधारण केले जाते ह्यामुळे *उंच भागात* माती संचय होतो. धावणारे पाणी चालते आणि चालणारे पाणी थांबते. *थोड्याशा सखल भागात* शेतकऱ्यांची शेती असते याठिकाणी शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतात *उताराला आडवे बांधबंदिस्ती केली जाते. बांधावर पडलेल्या जमिनीमध्ये जंगली वृक्ष किंवा फळबाग लागवड केली जाते. शेतामध्ये उताराला आडवी पेरणी करणे. पिकांची फेर पालट करणे. पारंपरिक सिंचनाला बगल देऊन मटका, ठिबक, तुषार सिंचन पद्धती वापरणे. मल्चिंग वापरून पाण्याचे बाष्पीभवन थांबविणे. कृषी व कृषी पुरक व्यवसायांना प्राधान्य देणे.*अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती वापरून ...