Posts

Showing posts from April, 2026

म्हातारा मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये.

एक घर, दोन निर्णय: कर्तव्याची 'पेरणी' अविनाश आणि सुहास हे दोन भाऊ शहरात स्थायिक झाले होते. अविनाश आणि सुहास दोघेपण बऱ्यापैकी चालणाऱ्या कंपनीत महत्त्वाच्या पदावर होते. दोघांच्याही आयुष्यात फ्लॅटचे कर्ज, गाडीचे कर्ज आणि मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज सुरूच होती. सर्व सुरळीत सुरू असताना अचानक गावाहून फोन आला—त्यांच्या काकांचे निधन झाले होते. दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. हे तेच काका होते ज्यांनी अविनाश आणि सुहासच्या वडिलांच्या मृत्यूनंतर घरची जबाबदारी घेऊन दोघांचे शिक्षण पूर्ण केले होते. घरची जबाबदारी घेतली होती. आज काकांच्या मृत्यूने दोघांच्याही डोक्यावरचा आधार निघाला होता.  अविनाश आणि सुहास दोघेपण जबाबदार पदावर होते, त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये रोज जबाबदारीने काम करावे लागायचे. आज नुकतेच ऑफिसमधून घरी आले, कसेबसे जेवण करून 10 वाजता उद्याच्या कामाचे नियोजन डोक्यात ठेवून नुकतेच बेडवर पडले होते इतक्यात गावावरून फोन आला, "काका गेले..." आज ऑफिसमध्ये अविनाश आणि त्याच्या बॉसचे व्यवस्थित बोलणे झाले होते. बॉसने अविनाशला उद्याची डील फायनल करायला सांगितले होते. कंपनी नुकतीच कोरोन...

जोतिबाचा आशीर्वाद... India on Wheel (Travel Stories 3)

 जोतिबाच्या गाभाऱ्यात मी शांतपणे बसून होतो. कुठे जायचे माहीत नाही, का आलोय माहिती नाही, कधी पर्यंत बसायचे माहीत नाही. बस, जोपर्यंत मन करते तोपर्यंत बसून राहायचे आणि मनाला वाटले की उठून जायचे. संसाराचे प्रश्न संताना सुटले नाहीत मग मी कोण बापडा..  आता जोतिबाकडे येणाऱ्या लोकांची संख्या वाढली होती. सर्वांची गडबड चालली होती. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर जोतिबाकडे गार्हाणे मांडून भाविक पुढच्या मार्गाला चालले होते. 8 च्या सुमारास गर्दी इतकी वाढली की मला नाईलाजास्तव उठावे लागले. इतक्या वेळात ना जोतिबाने मला काही सांगितले ना मी जोतिबाकडे काही मागितले.  गुलालाने माखलेल्या पायऱ्या तुडवत तुडवत मी वर आलो. जोतिबाच्या डोंगरावर आता चांगलीच वर्दळ सुरू झाली होती. मी तसाच खाली आलो, यमाईच्या दर्शनाला कोणी आलेले दिसत नव्हते. यमाईचा शांत, निसर्गरम्य वातावरणात बस्स इथेच स्थायिक व्हावे असे वाटत होते. निसर्गाच्या सानिध्यात पिठाने भरलेल्या कट्ट्यावर निवांत बसलो होतो. बसल्या - बसल्या कधी डोळा लागला कळलंच नाही. सुख नक्की काय असते ते मला इथे कळले.  नुकतेच लग्न झालेल्या दांपत्याने मला झोपेतून ज...

From Survival to Systems Change: The Journey of Mahesh Borge

Image
Mahesh Borge’s journey is a story of resilience, self-driven transformation, and purpose-led leadership. From becoming the sole breadwinner at a young age with limited formal education to rising into senior roles within the State Government of Maharashtra and the ICICI Foundation, he has built a path defined by perseverance and impact. Today, as the Founder President of Mazisheti Shetkari Pratishthan, he bridges the gap between corporate CSR vision and grassroots realities, while also leading diverse ventures across social, hospitality, and agricultural sectors.  Mahesh Borge ’s journey is a powerful blend of resilience, purpose, and impact—spanning from personal hardship to leadership across government, corporate philanthropy, and entrepreneurship. A specialist in sustainable development and social impact, Mahesh has dedicated his career to driving meaningful change through senior roles in the  State Government of Maharashtra  and the  ICICI Foundation . These exper...