म्हातारा मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये.
एक घर, दोन निर्णय: कर्तव्याची 'पेरणी' अविनाश आणि सुहास हे दोन भाऊ शहरात स्थायिक झाले होते. अविनाश आणि सुहास दोघेपण बऱ्यापैकी चालणाऱ्या कंपनीत महत्त्वाच्या पदावर होते. दोघांच्याही आयुष्यात फ्लॅटचे कर्ज, गाडीचे कर्ज आणि मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज सुरूच होती. सर्व सुरळीत सुरू असताना अचानक गावाहून फोन आला—त्यांच्या काकांचे निधन झाले होते. दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. हे तेच काका होते ज्यांनी अविनाश आणि सुहासच्या वडिलांच्या मृत्यूनंतर घरची जबाबदारी घेऊन दोघांचे शिक्षण पूर्ण केले होते. घरची जबाबदारी घेतली होती. आज काकांच्या मृत्यूने दोघांच्याही डोक्यावरचा आधार निघाला होता. अविनाश आणि सुहास दोघेपण जबाबदार पदावर होते, त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये रोज जबाबदारीने काम करावे लागायचे. आज नुकतेच ऑफिसमधून घरी आले, कसेबसे जेवण करून 10 वाजता उद्याच्या कामाचे नियोजन डोक्यात ठेवून नुकतेच बेडवर पडले होते इतक्यात गावावरून फोन आला, "काका गेले..." आज ऑफिसमध्ये अविनाश आणि त्याच्या बॉसचे व्यवस्थित बोलणे झाले होते. बॉसने अविनाशला उद्याची डील फायनल करायला सांगितले होते. कंपनी नुकतीच कोरोन...