Posts

आधुनिक शेती - महेश बोरगे

Image
वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जल, जनावर, जंगल व जमीन वाढत नाही. तर ते दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. जमिनीची धूप होऊन माती समुद्राकडे चालली आहे. जास्तीच्या पाणी उपसा व त्या प्रमाणात मुरण्याचे प्रमाण कमी झाले त्यामुळे भुजल पातळी कमी झाली आहे. यासाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने शेती करावी किंवा केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने *जल, जंगल, जनावर, जमीन यांचे संरक्षण आणि वाढ करणे यावर भर दिला जातो.* उदा. म्हणजे माथा ते पायथा जल व मृद संधारण केले जाते ह्यामुळे *उंच भागात* माती संचय होतो. धावणारे पाणी चालते आणि चालणारे पाणी थांबते. *थोड्याशा सखल भागात* शेतकऱ्यांची शेती असते याठिकाणी शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतात *उताराला आडवे बांधबंदिस्ती केली जाते. बांधावर पडलेल्या जमिनीमध्ये जंगली वृक्ष किंवा फळबाग लागवड केली जाते. शेतामध्ये उताराला आडवी पेरणी करणे. पिकांची फेर पालट करणे. पारंपरिक सिंचनाला बगल देऊन मटका, ठिबक, तुषार सिंचन पद्धती वापरणे. मल्चिंग वापरून पाण्याचे बाष्पीभवन थांबविणे. कृषी व कृषी पुरक व्यवसायांना प्राधान्य देणे.*अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती वापरून ...

हिरवळीची वाट - महेश बोरगे

Image
(माझ्या डायरीमधील "हिरवळीची वाट" या सदरातील निवडक परिच्छेद) - महेश बोरगे आणि आज पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली. वृक्षांची सळसळती पाने पुन्हा एकदा वाऱ्यावर उडाली. हवेत गारवा आणि उंचपर्यंत धुळीचे काहुर माजले होते. मनातील भावना चहाच्या कपातील वादळासारख्या उसळत होत्या. दाही दिशा चालून येऊ लागल्या आहेत. सुंदर चेहरे आणि त्यांच्या पाठी दडलेल्या काळवंडलेल्या छटा पुन्हा एकदा उसळ्या मारून पुढे येऊ लागल्या आहेत. आयुष्यात पहिल्यांदाच सरसर मागील आठ ते दहा वर्षे निघून गेलेली पण कळली नाहीत.  सुफी गायनाने मनाला प्रसन्नता मिळत असली तरी एकाच प्रकारचे संगीत समाज ऐकू देईल तर शप्पथ.... अधून मधून श्रावणाच्या सरींप्रमाणे हलक्या सुफी संगीताने प्रसन्नता मिळवून घेणे आवश्यक वाटले आणि आजही या संगीताच्या जोरावर या भयाण वादळी वाऱ्याच्या आयुष्याच्या वाटचालीत मार्गक्रमण चालू ठेवले आहे.  काळोख्या रात्री दहा दिशांनी दरवाजे बंद केले तेंव्हा त्या एका मिणमिणत्या ज्योतीच्या प्रकाशात एक एक पाऊल टाकत कसाबसा रास्ता धुंडाळावा लागला. पण या भयाण वादळात ती इवलीशी ज्योत काय तग धरणार.... शेवटच्या...

Business Development

Image
व्यवसाय विकासासाठी काही आवश्यक टिप्स  ग्रामीण भागातील तरुणांनी शेती व उपलब्ध साधनसंपत्तीचा स्वतःचे उपजत कलागुण वापरून स्वतःचे उत्पादन व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी संस्था संसाधन केंद्र मधून माहिती दिली जाते. व्यवसाय मार्गदर्शन सदरातील या उर्वरित टिप्स... तुमचे व्यवसाय विकासाचे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी मदत करू शकतात. *अपयश किंवा यश या जबाबदारीवर भर:* एक चांगला व्यावसाईक विकसित होण्यासाठी ध्येयाबरोबर साधनसुविधा असणे ही महत्त्वाचे आहेत. सुरवातीपासूनच यश किंवा अपयश यांचा विचार आपल्यापरीने केला पाहिजे कारण प्रत्येक व्यवसायात चढ-उतार येतच असतात. *· संधी मूल्यांकन:* कंपनीचा विकास हा नवीन धोरण स्वीकारण्यावर आणि बाजारपेठेतील आव्हाने समजून घेण्यावर अवलंबून आहे. याची गरज का आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. नवीन व्यावसाईकाना नवीन बाजार करण्यास आपली कंपनी सक्षम आहे का? आणि आहे तर ते कसे ? याचे ध्येय स्पष्ट असले पाहिजे. *· सौदे (deals)काळजीपूर्वक करा:* करार करणे आणि योग्य करार करणे या दरम्यान एक मोठा फरक आहे. एक चांगला dealmaker खोटे सिग्नल ओळखण्यास मदत क...

"समर्पण" - महेश बोरगे

Image
तु खुप समजुतदार आहेस. अगदी सुरवातीपासुन तु सर्व निर्णय पुर्ण विचार करुन घेतले आहेस. नातेसंबंध असोत, मिञ असोत वा घरातील कठीन प्रसंग असोत तु ठामपणे अचल आहेस. तुला नेहमी जे योग्य वाटले ते तु केले आहेस आणि इथुन पुढे भविष्यातही करशील यात शंका नाही. प्रत्येक निर्णय घेताना ठाम रहा, समाजाचा विचार करु नको. फक्त काळजी घे की कोणाच्या मुलभुत हक्कांवर तुझ्यामुळे गदा येवु देवु नको. आयुष्याच्या या मायाजालात तु, मी, आपन सर्वजन काहीच नाही आहोत. वेळ इतका वेगवान आहे की बालपन केंव्हा गेले , शिक्षण संपले कधी कळलेच नाही. इथुन पुढेही वेळ कधी सरुन गेला कळणार नाही.  आपले संस्कार, संस्कृती जोपासुन आयुष्यातील निर्णय घे. सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवुन भौतीक सुखास प्राधान्य न देता आयुष्याची गाडी हाकायची असते. संस्कार, समाज, शिक्षण, आयुष्याचा साथीदार, मुले यामध्ये नेहमीच गुंतवणुक कर. बारकाईने भविष्याचा विचार कर. भुतकाळात एक पाऊल, भविष्यात एक पाऊल ठेवुन वर्तमानाचा आनंद घे. भुतकाळाला कुरवाळत बसु नको, भविष्याचा जास्त विचार करुन वर्तमानातील वेळ वाया जाऊ देवु नको. स्वत:शी संबंधीत निर्णय घेताना कोणाचाह...

मैथुन - स्वप्नील शिर्सेकर

Image
स्वतःच्या जननेंद्रियांना (शिस्न अथवा योनी) विविध प्रकारे उत्तेजित करण्याच्या क्रियेला हस्तमैथुन म्हणतात. [१] बहुतेक वेळा हस्तमैथुनाचा परिणाम लैंगिक उत्कटताबिंदू (इंग्रजी: Orgasm) गाठण्यात होतो. बहुतेक व्यक्ती स्वतःच्या हातांनी, किंवा इतर वस्तूंनी जननेंद्रियांचे घर्षण करून हस्तमैथुन करतात. सहसा 'हस्तमैथुन' शब्दाचा अर्श एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या स्वतःला लैंगिक उत्तेजित करणे असा होतो. काही वेळा दोन व्यक्तींनी हस्तमैथुनासारख्या क्रिया एकमेकांच्या जननेंद्रियांवर करून, दुसऱ्यास लैंगिक उत्कटता मिळवून देण्याच्या क्रियेस सामायिक हैस्तमैथुन असे म्हणतात. (इंग्रजी: Mutual masturbation) पौगंडावस्थेत येताच मुलांमध्ये व मुलींमध्ये हस्तमैथुन करण्याची इच्छा नैसर्गिकपणे निर्माण होते. काहीवेळा लैंगिक स्वप्न पडून स्वप्नामध्ये वीर्यस्खलन होऊ शकतं. या सर्व गोष्टी अनेक मुलांमध्ये घडतात. त्यात अघटित असं काही नाही व त्यापासून काही अपायही होत नाही. [२] लैंगिक उत्तेजना दाटली गेली की तिची वाट मोकळी व्हावी म्हणून निसर्गानेच या रचना ठेवल्या आहेत. हस्तमैथून म्हणूनच कुणाकडून शिकावं लागत नाही. ...

आगमन गणरायाचे... - महेश बोरगे

Image
गेली 3 ते 4 दिवसांपासून मला माझ्या बाबतीत निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य राहिले नाही. इतकी गडबड आणि थ्रिल कधीच अनुभवले नाही. मी प्रत्येक दिवशी काही न काही एक नवीन अनुभव गाठीला बांधत असतो. या चार दिवसांत मात्र माझे आयुष्य कोणीतरी दुसराच चालवतोय आणि मी यंत्रासारखा फक्त चालवला जातोय असा भास होऊ लागला आहे. त्यातून गणपतींचे आगमन आणि या घटना याचे लागेबांधे असावे असे वाटू लागले. अगदी सुरुवातीपासून बोलायचे झाले तर मी आणि माझा मित्र बराच प्रवास केल्यामुळे दमून सावळज मध्ये प्रवेश केला. अगदी सुरुवातीलाच भव्य गणपतीचा स्टॉल लावलेला दिसला. मित्राने त्याच्याकडे गणपती नोंदवला आणि त्याची ती नोंदणी चालू होती तोपर्यंत विक्रेत्याशी माझी चर्चा सुरू झाली. इकडचे तिकडचे बोलताना समजले तो कार्यकर्ता माझीशेतीचा फॅन आहे. आता सावळज म्हणले की आपसुकच शेतकरी वर्गातून माझीशेतीची विचारणा होतेय.  मी त्याला जाणीवपूर्वक माझी ओळख सांगितली नाही. (खरंतर कार्यक्रम सोडून इतर वेळी मला कोणी पाहिले तर त्याचा विश्वासच बसणार नाही की मी माझीशेतीसाठी काम करत असेन, कारण मुलांच्यात मुलगा बनून आणि मोठ्यांच्यात मोठा बनून रहायचं...

“मै ऐसा ही हूँ ”...

Image
मी फार टेक्नीकल बोलतो, अस सारख वाटत होत तिला, “मै ऐसा ही हूँ ” म्हणुन, सांगू तरी कस तिला. ती म्हणते बघ ना रे, सुटलाय धुंद गार वारा, मी म्हणतो हवामान खात्याने, दिला होता कालच इशारा. ती म्हणते हात तुझा, किती उबदार वाटतो मला, मी म्हणतो बहुतेक असेल, किंचितसा ताप मला. मी म्हणतो समुद्राच्या पाण्यात, कैल्शियम च फेस आहे, ती म्हणते काही सांगू नकोस, तू मोठी सायकोलोजिकल केस आहेस . ती रोमांस मधली नजाकत मला सांगते, मी सुद्धा गुणसुत्रांची गुंतागुंत सांगतो, ती कपाळावर स्वतःच्या मारून घेते , मी पुढच्या वाक्याची वाट पाहतो... आता हळू हळू मला प्रेमाचे, विज्ञान कळायला लागलय, तिलापन माझ्या सोबत राहून, विज्ञानावर प्रेम बसलय...