Posts

Showing posts from 2017

भावना - अव्यक्त भावनांची कहाणी भाग - ०१

Image
ढगांनी दाटी केलेली आणि काही केल्या काळोख हटायला तयार नव्हता. वास्तविक ज्यांच्यावर आयुष्याची डोर ठेवायची त्यांचीच इच्छा नव्हती कि मी जन्माला यावं. का कोणास ठावूक पण या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कारण असतेच असते. मी जन्माला येण्यापुर्वीच माझ्या बापाला मला का जगात येवू द्यायचं नव्हत माझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे. तसे पहिले तर माझा बाप काही साधासुधा नव्हता. कुशल नेतृत्व, उत्तम संवादकला, दिलखेचक वक्तृत्व यासोबत तंत्रज्ञानाची जोड यामुळे माझा बाप बऱ्याच भागातील शेतकरी वर्गाला माहिती होता. स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा कधी विचार न करणारा माझा बाप इतका सामाजिक कसा झाला याचाही कधीतरी विचार करावा असे वाटते.  जगातल्या काही प्रमुख बोटांवर मोजणाऱ्या शहरांपैकी एका शहरात माझा जन्म झाला. दिवसरात्र या मायानगरीत प्रत्येकजण नवीन स्वप्ने घेवून दाखल होत होते. लहान-थोर, अबालवृद्ध, स्त्री-पुरुष, चाकरमाने, व्यापारी, व्यावसायिक, कलाकार यांनी गजबजलेल्या या शहरात कोणीही कमनशिबी रहात नव्हते मग मी तर येथेच जन्माला आलीय. घरातुन बाहेर पडले कि झगमगाटात चालणारी दिवसरात्र वाहनांची वर्दळ कधी कधी वैताग ...

प्रयत्नांती परमेश्वर.... - महेश बोरगे

Image

आधुनिक शेती - महेश बोरगे

Image
वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जल, जनावर, जंगल व जमीन वाढत नाही. तर ते दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. जमिनीची धूप होऊन माती समुद्राकडे चालली आहे. जास्तीच्या पाणी उपसा व त्या प्रमाणात मुरण्याचे प्रमाण कमी झाले त्यामुळे भुजल पातळी कमी झाली आहे. यासाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने शेती करावी किंवा केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने *जल, जंगल, जनावर, जमीन यांचे संरक्षण आणि वाढ करणे यावर भर दिला जातो.* उदा. म्हणजे माथा ते पायथा जल व मृद संधारण केले जाते ह्यामुळे *उंच भागात* माती संचय होतो. धावणारे पाणी चालते आणि चालणारे पाणी थांबते. *थोड्याशा सखल भागात* शेतकऱ्यांची शेती असते याठिकाणी शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतात *उताराला आडवे बांधबंदिस्ती केली जाते. बांधावर पडलेल्या जमिनीमध्ये जंगली वृक्ष किंवा फळबाग लागवड केली जाते. शेतामध्ये उताराला आडवी पेरणी करणे. पिकांची फेर पालट करणे. पारंपरिक सिंचनाला बगल देऊन मटका, ठिबक, तुषार सिंचन पद्धती वापरणे. मल्चिंग वापरून पाण्याचे बाष्पीभवन थांबविणे. कृषी व कृषी पुरक व्यवसायांना प्राधान्य देणे.*अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती वापरून ...

हिरवळीची वाट - महेश बोरगे

Image
(माझ्या डायरीमधील "हिरवळीची वाट" या सदरातील निवडक परिच्छेद) - महेश बोरगे आणि आज पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली. वृक्षांची सळसळती पाने पुन्हा एकदा वाऱ्यावर उडाली. हवेत गारवा आणि उंचपर्यंत धुळीचे काहुर माजले होते. मनातील भावना चहाच्या कपातील वादळासारख्या उसळत होत्या. दाही दिशा चालून येऊ लागल्या आहेत. सुंदर चेहरे आणि त्यांच्या पाठी दडलेल्या काळवंडलेल्या छटा पुन्हा एकदा उसळ्या मारून पुढे येऊ लागल्या आहेत. आयुष्यात पहिल्यांदाच सरसर मागील आठ ते दहा वर्षे निघून गेलेली पण कळली नाहीत.  सुफी गायनाने मनाला प्रसन्नता मिळत असली तरी एकाच प्रकारचे संगीत समाज ऐकू देईल तर शप्पथ.... अधून मधून श्रावणाच्या सरींप्रमाणे हलक्या सुफी संगीताने प्रसन्नता मिळवून घेणे आवश्यक वाटले आणि आजही या संगीताच्या जोरावर या भयाण वादळी वाऱ्याच्या आयुष्याच्या वाटचालीत मार्गक्रमण चालू ठेवले आहे.  काळोख्या रात्री दहा दिशांनी दरवाजे बंद केले तेंव्हा त्या एका मिणमिणत्या ज्योतीच्या प्रकाशात एक एक पाऊल टाकत कसाबसा रास्ता धुंडाळावा लागला. पण या भयाण वादळात ती इवलीशी ज्योत काय तग धरणार.... शेवटच्या...

Business Development

Image
व्यवसाय विकासासाठी काही आवश्यक टिप्स  ग्रामीण भागातील तरुणांनी शेती व उपलब्ध साधनसंपत्तीचा स्वतःचे उपजत कलागुण वापरून स्वतःचे उत्पादन व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी संस्था संसाधन केंद्र मधून माहिती दिली जाते. व्यवसाय मार्गदर्शन सदरातील या उर्वरित टिप्स... तुमचे व्यवसाय विकासाचे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी मदत करू शकतात. *अपयश किंवा यश या जबाबदारीवर भर:* एक चांगला व्यावसाईक विकसित होण्यासाठी ध्येयाबरोबर साधनसुविधा असणे ही महत्त्वाचे आहेत. सुरवातीपासूनच यश किंवा अपयश यांचा विचार आपल्यापरीने केला पाहिजे कारण प्रत्येक व्यवसायात चढ-उतार येतच असतात. *· संधी मूल्यांकन:* कंपनीचा विकास हा नवीन धोरण स्वीकारण्यावर आणि बाजारपेठेतील आव्हाने समजून घेण्यावर अवलंबून आहे. याची गरज का आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. नवीन व्यावसाईकाना नवीन बाजार करण्यास आपली कंपनी सक्षम आहे का? आणि आहे तर ते कसे ? याचे ध्येय स्पष्ट असले पाहिजे. *· सौदे (deals)काळजीपूर्वक करा:* करार करणे आणि योग्य करार करणे या दरम्यान एक मोठा फरक आहे. एक चांगला dealmaker खोटे सिग्नल ओळखण्यास मदत क...

"समर्पण" - महेश बोरगे

Image
तु खुप समजुतदार आहेस. अगदी सुरवातीपासुन तु सर्व निर्णय पुर्ण विचार करुन घेतले आहेस. नातेसंबंध असोत, मिञ असोत वा घरातील कठीन प्रसंग असोत तु ठामपणे अचल आहेस. तुला नेहमी जे योग्य वाटले ते तु केले आहेस आणि इथुन पुढे भविष्यातही करशील यात शंका नाही. प्रत्येक निर्णय घेताना ठाम रहा, समाजाचा विचार करु नको. फक्त काळजी घे की कोणाच्या मुलभुत हक्कांवर तुझ्यामुळे गदा येवु देवु नको. आयुष्याच्या या मायाजालात तु, मी, आपन सर्वजन काहीच नाही आहोत. वेळ इतका वेगवान आहे की बालपन केंव्हा गेले , शिक्षण संपले कधी कळलेच नाही. इथुन पुढेही वेळ कधी सरुन गेला कळणार नाही.  आपले संस्कार, संस्कृती जोपासुन आयुष्यातील निर्णय घे. सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवुन भौतीक सुखास प्राधान्य न देता आयुष्याची गाडी हाकायची असते. संस्कार, समाज, शिक्षण, आयुष्याचा साथीदार, मुले यामध्ये नेहमीच गुंतवणुक कर. बारकाईने भविष्याचा विचार कर. भुतकाळात एक पाऊल, भविष्यात एक पाऊल ठेवुन वर्तमानाचा आनंद घे. भुतकाळाला कुरवाळत बसु नको, भविष्याचा जास्त विचार करुन वर्तमानातील वेळ वाया जाऊ देवु नको. स्वत:शी संबंधीत निर्णय घेताना कोणाचाह...

मैथुन - स्वप्नील शिर्सेकर

Image
स्वतःच्या जननेंद्रियांना (शिस्न अथवा योनी) विविध प्रकारे उत्तेजित करण्याच्या क्रियेला हस्तमैथुन म्हणतात. [१] बहुतेक वेळा हस्तमैथुनाचा परिणाम लैंगिक उत्कटताबिंदू (इंग्रजी: Orgasm) गाठण्यात होतो. बहुतेक व्यक्ती स्वतःच्या हातांनी, किंवा इतर वस्तूंनी जननेंद्रियांचे घर्षण करून हस्तमैथुन करतात. सहसा 'हस्तमैथुन' शब्दाचा अर्श एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या स्वतःला लैंगिक उत्तेजित करणे असा होतो. काही वेळा दोन व्यक्तींनी हस्तमैथुनासारख्या क्रिया एकमेकांच्या जननेंद्रियांवर करून, दुसऱ्यास लैंगिक उत्कटता मिळवून देण्याच्या क्रियेस सामायिक हैस्तमैथुन असे म्हणतात. (इंग्रजी: Mutual masturbation) पौगंडावस्थेत येताच मुलांमध्ये व मुलींमध्ये हस्तमैथुन करण्याची इच्छा नैसर्गिकपणे निर्माण होते. काहीवेळा लैंगिक स्वप्न पडून स्वप्नामध्ये वीर्यस्खलन होऊ शकतं. या सर्व गोष्टी अनेक मुलांमध्ये घडतात. त्यात अघटित असं काही नाही व त्यापासून काही अपायही होत नाही. [२] लैंगिक उत्तेजना दाटली गेली की तिची वाट मोकळी व्हावी म्हणून निसर्गानेच या रचना ठेवल्या आहेत. हस्तमैथून म्हणूनच कुणाकडून शिकावं लागत नाही. ...

आगमन गणरायाचे... - महेश बोरगे

Image
गेली 3 ते 4 दिवसांपासून मला माझ्या बाबतीत निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य राहिले नाही. इतकी गडबड आणि थ्रिल कधीच अनुभवले नाही. मी प्रत्येक दिवशी काही न काही एक नवीन अनुभव गाठीला बांधत असतो. या चार दिवसांत मात्र माझे आयुष्य कोणीतरी दुसराच चालवतोय आणि मी यंत्रासारखा फक्त चालवला जातोय असा भास होऊ लागला आहे. त्यातून गणपतींचे आगमन आणि या घटना याचे लागेबांधे असावे असे वाटू लागले. अगदी सुरुवातीपासून बोलायचे झाले तर मी आणि माझा मित्र बराच प्रवास केल्यामुळे दमून सावळज मध्ये प्रवेश केला. अगदी सुरुवातीलाच भव्य गणपतीचा स्टॉल लावलेला दिसला. मित्राने त्याच्याकडे गणपती नोंदवला आणि त्याची ती नोंदणी चालू होती तोपर्यंत विक्रेत्याशी माझी चर्चा सुरू झाली. इकडचे तिकडचे बोलताना समजले तो कार्यकर्ता माझीशेतीचा फॅन आहे. आता सावळज म्हणले की आपसुकच शेतकरी वर्गातून माझीशेतीची विचारणा होतेय.  मी त्याला जाणीवपूर्वक माझी ओळख सांगितली नाही. (खरंतर कार्यक्रम सोडून इतर वेळी मला कोणी पाहिले तर त्याचा विश्वासच बसणार नाही की मी माझीशेतीसाठी काम करत असेन, कारण मुलांच्यात मुलगा बनून आणि मोठ्यांच्यात मोठा बनून रहायचं...

“मै ऐसा ही हूँ ”...

Image
मी फार टेक्नीकल बोलतो, अस सारख वाटत होत तिला, “मै ऐसा ही हूँ ” म्हणुन, सांगू तरी कस तिला. ती म्हणते बघ ना रे, सुटलाय धुंद गार वारा, मी म्हणतो हवामान खात्याने, दिला होता कालच इशारा. ती म्हणते हात तुझा, किती उबदार वाटतो मला, मी म्हणतो बहुतेक असेल, किंचितसा ताप मला. मी म्हणतो समुद्राच्या पाण्यात, कैल्शियम च फेस आहे, ती म्हणते काही सांगू नकोस, तू मोठी सायकोलोजिकल केस आहेस . ती रोमांस मधली नजाकत मला सांगते, मी सुद्धा गुणसुत्रांची गुंतागुंत सांगतो, ती कपाळावर स्वतःच्या मारून घेते , मी पुढच्या वाक्याची वाट पाहतो... आता हळू हळू मला प्रेमाचे, विज्ञान कळायला लागलय, तिलापन माझ्या सोबत राहून, विज्ञानावर प्रेम बसलय...

नपुंसक कोण…? - अमोलराज

Image
नपुंसक कोण…? (संकलित) कामानिमीत्त शनिवारी मुंबईला जाण्याचा योग आला..संतोष दादा आणी मी शनिवारी रात्री मुंबईसाठी औरंगाबाद वरुन निघालो..सकाळी सकाळी सहा च्या दरम्यान आम्ही माझा बहीणीच्या सविता ताईच्या घरी पोहचलो होतो.रात्रभर झोप न झाल्यामुळे सकाळी फार झोप येत होती..पण ओम ला आणी पियुष ला पाहताच एका क्षणात झोप उङाली आणी ताजतवान वाटु लागल..ओम आणी पियुष सोबत थोङ्या वेळ मी खेळलो आणी जेवण वैगेरे करुन सकाळी दहाच्या सुमारास ताईच्या घरुन निघालो..दुपार पर्यन्तं काम आवरुन दादा आणी मी मरिन लाईन्स वर तीन ला पोहचलो..तिथे थोङासा Enjoy करुन औरंगाबादला जाण्यासाठी सायंकाळी सहा ला CST रेल्वे स्टेशनवर आलो.. अचानक मुंबई ला याव लागल्यामुळे रेल्वेच Reservation मिळाल नव्हत..जनरल ङब्यात जागा पकङण्यासाठी दादा आणी मी जवळजवळ तीन तास अगोदरच रेल्वे स्टेशन वर येवुन बसलो होतो.देवगिरी एक्सप्रेस रात्री सव्वा नऊ ला होती..साङे आठ ला गाङी प्लेटफाॅर्लमा लागली..दादा आणी मी खिङकी जवळ समोरासमोरच्या सिट पकङुन बसलो..रेल्वेच्या जनरल ङब्यात दरवाज्या जवळ खिङकीत सिंगल सिंगल सिट पकङण म्हणजे एकट्याने किल्ला लढवावा आणी तो जि...

"स्वत्वपरीक्षा - महेश बोरगे

Image
स्त्री नेहमी जग जिंकायची ताकत बाळगते पण ज्यांच्यासाठी कष्ट करायचे, राबायचे, हाडाची काडे करायची त्यांना याची तसुभर चिंता नसते. जेंव्हा समाज बघ्याची भूमिका घेतो आणि "समाज काय म्हणेल" या तीन शब्दावर आयुष्य फिरायला सुरुवात होते तेंव्हा संघर्षशक्ती पणाला लागते. त्यातूनही स्त्री अशी ताकत आहे कि ती जगाला दिशा देऊ शकते पण स्वाभाविक प्रेमळ, हळवी असणारी स्त्री फक्त हृदयातुन विचार करते त्यामुळे परिस्थिती चिघळत जाते. मेंदूने विचार केली तरच अश्या परिस्थितीतून बाहेर पडू शकते. या परिस्थितीत स्त्रियांनी खचून न जाता परिस्थितीशी दोन हात करायला सज्ज व्हायला पाहिजे. सज्ज होणे म्हणजे युद्ध पुकारणे असे नाही. अगदी लहानपणापासुन शब्दांचा मारा करून करून मुलींची उमेद कमी करायचे काम पालक करीत असतात. कितीही कर्तुत्व सिद्ध केले... चांगली नोकरी अथवा उद्योग जरी उभा केला तरी मुलगी वस्तू असल्यासारखी दाखवली जाते. पालकांच्या भाबड्या आश्या, लहानपणापासुन केलेला शब्दांचा मारा यातुन आजच्या जमान्यातील मुलींच्या मनातही मी स्वतंत्र आहे, मी सर्वकाही करू शकते या विचारासोबत माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी असे केले ...

अधुरी आहट - महेश बोरगे

Image
मुझे पता नही मेरी लिखावट कैसी है, पर बहुत दिनों के बाद एक खास दोस्त ने पुछा की तुम कितने बदल गए हो। हर वक्त टीचर की तरह कुछ न कुछ बोलते हो, कभी कबार कुछ रोमांटिक भी लिखा करो, ताकि हम भी तुम्हारी लिखापढ़ी जान सकें। इसलिये आज थोड़ीसी खींचतान के बाद यह चार लाइन लिखी हैं। पहली बार ऐसा कुछ लिखा है, दोस्तों कमेंट जरूर करना। "अधुरी आहट" बड़े दिनों के बाद मेरी जिंदगी में फिर से बहार खिली हुई हैं। वैसे कभी जिंदगी में कुछ कमी नहीं थी पर एक खाली पन था। पता नहीं पर हर पल कुछ कमी हैं ऐसा लगता था। न कोई अपना समजने वाला था, न कोई ऐसा था जिसके लिए दिल मचलता था। एक मशीन सी थी मेरी जिंदगी, दिन ब दिन काम काम और काम था। एक जुनून सी थी मेरी जिंदगी। जैसे हर दिन शिकारी के तरह शिकार करने के लिए निकलना और शाम तक शिकार करके ही वापस आना। पूरी रफ्तार से जिंदगी चल रही थी। इस दौरान कई दोस्त साथ आये और चले भी गए। किसी की तलाश थी जो कभी पूरी नही हो रही हैं। आज सालों बाद कुछ हड़बड़ाहट हुई और पता चला कि तुही है, जिसकी मैं बरसों से राह देख रहा हूँ। मुझे पता नहीं था कि तुही मेरी जीवन की सावन की घटा थी...

घुसमट - महेश बोरगे

Image
जीवनात नाती जपताना तारेवरची कसरत करावी लागते. प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. स्पर्धेच्या युगात स्थळ, वेळ आणि परिस्थिती नुसार मानवी स्वभावाचे पैलू नजरेस अनुभवास येतात. म्हणजे जो व्यक्ती कार्यालयीन वेळेनंतर जितका पोरकट वाटतो तोच व्यक्ती कार्यालयात इतका प्रगल्भ बनतो की जणू काही दुसरा न्यूटनच.… असो, मला इतकेच म्हणायचे आहे की आजच्या घडीला कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावविषयी कोणतेही गृहीतक लागू होत नाही. महान पंडित (?) म्हणतात की चेहरा पाहिला की स्वभाव सांगू शकतो पण आज घडीला सुपर कॉम्प्युटर देखील अपयशी ठरतील इतके मानवी स्वभावात चढ उतार जाणवतात. कोण केंव्हा कसा प्रतिक्रिया देईल याचा अंदाज बांधणे शक्य नाही. खाजगी आयुष्यातील क्षणांना देखील आज स्पर्धेच्या युगात जागा मिळणे कठीण झालेय. मित्रमैत्रिणी, कुटुंबीय, शेजारी, नातेवाईक या सर्वांनाच वेळचे नियोजन करता करता नाकीनऊ येत आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने सर्वांची जपणूक करण्याचा प्रयत्न करत असतो पण दिवसेंदिवस घुसमट वाढत जाते आणि अंतिम टप्प्यात तो किंवा ती खूप गर्विष्ठ आहे असे म्हणून बाकीचे बोट दाखवून रिकामे होत आहेत. इतक्या धकाधकी...

"आनंदवन समाजभान अभियान." - महेश निंबाळकर

Image
अगदी ३ महिन्यांपूर्वी काम कसं करायचं हा प्रश्न घेऊन "स्नेहग्राम" उभारणी वादळ मनात सुरु झालं होतं. एके दिवशी अचानक श्री. कौस्तुभदादा आमटे यांचा मॅसेज आला की, "मी पुण्यात आहे, भेटायला ये."  मी दोन दिवसांत पुण्याला पोहोचलो. तिथं बरीचशी  चर्चा झाली. तसे "सृजन व्हिलेज" या व्हॉटअप ग्रुपमधून आजवरच्या गरजू व होतकरुंना उभारलेल्या मदतनिधी वा विविध संस्थांना साहित्य वाटप असो, हे सर्व कौस्तुभदादा अगदी जवळुन पहात होते. परंतु या सार्‍या गोष्टीत तुझ्या प्रकल्पाचे काय? त्याच्या स्थिती काय? तो कधी सुरु करायचा? हा गंभीर प्रश्न चर्चेतुन माझ्या पुढे उभारला.  अगदी क्षणाचाही विलंब न करता कौस्तुभदादांनी माझ्या प्रश्नाची उकल केली- "आनंदवन समाजभान अभियान." आपण स्नेहग्रामला मुर्त्यरुप देऊयात, चर्चा झाली अन् अवघ्या ८-१० दिवसांनी कामास सुरुवातही झाली. दरम्यान कोरफळ्याच्या माळावर ना वीज ना पाणी अशी बिकट अवस्था त्यात उन्हाच्या तीव्र झळा. तरीही कसलाही विलंब न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. बोअर मारले त्यास पाणी लागले अन् पाया खोदून टीन शेडच्या उभारलीचे कामही सुरु...

कोलाहल - महेश बोरगे

Image
दडपण, मानसिक तणाव आणि खुप काही .... चेहऱ्यावरील उसने हसू मग दुनियेतल्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसते. जगातील सर्व दुःखाचे मूळ ही अपेक्षा आहे. जेंव्हा जेंव्हा अपेक्षाचा भंग होतो मानवी मनाचा कोलाहल वाढायला सुरुवात होते. कसे बाहेर पडायचे????? ---- महेश बोरगे. कोणी विचारणारे नसावे... कोणी ओळखणारे नसावे.... फक्त मी आणि मीच.... आयुष्याच्या गडबडीत मी स्वतःलाच विसरलो आहे. कोपऱ्यावरील पांडूच्या टपरीवर कट्ट्यावर बसुन चहा पिण्यासाठी देखील विचार करावा लागतो, कोणी पाहिलं तर.... निसर्गाने सर्व गोष्टी व्यवस्थित दिल्या आणि आपण मात्र अधिक सुख-सुविधा मिळवायच्या नादात दिवसेंदिवस अधिकाधिक दुखी आणि व्यस्त होतोय. दुधाचे बिल, लाईटचे बिल, पेपरवाला, प्लंबर, खुप सारे..... सकाळी उठल्यापासुन लगबग सुरु. मग अश्या वेळी काय होईल. एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस.... वर्षनुवर्षे तुम्ही मी सगळे घाण्याच्या बैलासारखे फिरत आहोत आणि पुढेही असेच राहील. यात लगेच काही बदल होईल असे वाटत नाही. खुप खुप करून झाले आणि अश्या गोष्टींची उबग आली तर...........??????? आयुष्य कसे असावे, कोकणातल्या वाहत्या आणि खळाळत...

आकरंदन - महेश बोरगे

Image
रात्रीचे 3 वाजलेत आणि त्या भयाण शांततेत माझा फोन खणा-खणा घंटानाद करू लागला. तसे आता मला फोनची सवय झाली आहे.... दिवस आणि रात्र माझ्यासाठी वेगळी नाही. तरीही अनोळखी नं.वरून आलेला फोन थोडा विचार करायला भाग पाडतोच...  फोन उचलून हॅलो म्हणायची संधी न देताच पलीकडून एक मुलगी घाबऱ्या आवाजात बोलली....  महेश सर मुझे यहा से ले चलो, मैं काफी परेशानी मे हुं।।  आवाज परिचयाचा वाटला आणि अंगावर सर्रर्रकन काटा आला. मन त्या भयाण रात्रीच्या अंधारात सैरावैरा धडपडू लागले....  आज पुन्हा नभ दाटुन आलेत. पावसाचे वातावरण तर नेहमीच होते पण आजचे वातावरण काही विचीञच आहे. सकाळपासुन मनावर मळभ दाटले आहे. सकाळी- सकाळी तिने खुप ओरडुन उठिवले. तिला मी सांगितले होते, उद्या काही काम नाही. तरीही उठिवले, त्यामुळे उठल्यापासुन माझी थोडी चिडिचड चालु झालेली.... रात्रभर काम करायचे आणि सकाळी सकाळी किरकिर....  ब्रश करताना, ती म्हणाली, "थोड्या वेळापुर्वी पप्पांचा फोन आलेला..., त्यांनी मला घरी बोलिवले आहे." एक दीर्घ श्वास घेऊन थोडा आवाज चढवुन म्हणाली, "तरी मी सांगत ह...